Home /News /lifestyle /

Sexual Wellness : 'ओरल सेक्स किळसवाणं वाटतं; ते खरंच सुरक्षित असतं का?'

Sexual Wellness : 'ओरल सेक्स किळसवाणं वाटतं; ते खरंच सुरक्षित असतं का?'

ओरल सेक्समुळे लैंगिक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो का? ओरल सेक्स (Oral Sex) करावं की टाळावं? - सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टने दिलेलं उत्तर...

प्रश्न - माझी गर्लफ्रेंड माझ्यावर ओरल सेक्ससाठी दबाव टाकत असून हे खूप किळसवाणं वाटतं. त्याचबरोबर योनीमार्गाच्या जवळ चाटल्यामुळे ( licking the vulva) लैंगिक संसर्गजन्य आजार Sexually Transmitted Diseases देखील होऊ शकतात असं मी ऐकलं आहे. हे खरं आहे का?
तुमच्या मनातल्या पण आतापर्यंत विचारू न शकलेल्या प्रश्नांची उत्तरं... सेक्शुअल वेलनेस एक्सपर्टकडून.
उत्तर : कोणत्याही रिलेशनशिप (Relationship) आणि शरीर संबंधांमध्ये (Sex life) दोघांनीही तितकाच सहभाग घ्यायला हवा. जर तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला ओरल सेक्स(Oral Sex) देत असेल तर तिने तुमच्याकडून देखील तीच अपेक्षा ठेवणे चूक नाही. हे अतिशय साधे मॅनर्स आहेत. योनी (vulva) ही देखील पुरुषाच्या लिंगाप्रमाणेच (Penis) एक अवयव आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोणत्याही स्त्रीची योनी किळसवाणी वाटत असेल तर तुम्ही अजूनही मॅच्युअर झालेला नाही. त्यामुळे यासाठी तुम्ही अजूनही तयार नाहीत असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही योनीविषयी आणखी माहिती वाचून आणि अभ्यास करून तुमच्या गर्लफ्रेंडला ओरल सेक्स देऊ शकता. शरीर संबंधांमध्ये कोणतीही गोष्ट वाईट नाही. त्याचबरोबर तुम्ही उपस्थित केलेला दुसरा प्रश्नदेखील अतिशय महत्त्वाचा आहे. महिलेला ओरल सेक्स देताना तुम्हाला लैंगिक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे. एखादी महिला ओरल सेक्स देत असेल तर त्याद्वारे देखील STD सारखा आजार होऊ शकतो. त्याचबरोबर साध्या किसिंगच्या वेळीदेखील संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे या सर्वातून वाचण्याचा सर्वात सोपा मार्ग हा कंडोम (condom) वापरणे आहे. तुम्ही गर्लफ्रेंडला ओरल सेक्स देताना डेंटल डॅम(dental dam) देखील वापरू शकता. यामुळे योनीमध्ये आणि तुमच्या तोंडामध्ये सुरक्षित अंतर राहील. या वस्तू तुम्ही ऑनलाइन किंवा मेडिकलच्या दुकानातून किंवा कंडोम विकत घेतलं त्या ठिकाणाहूनदेखील विकत घेऊ शकता. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या पार्टनरबरोबर शरीर संबंध (sex) करताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी या आजारांची चाचणीदेखील करून घ्यावी. त्यामुळे या आजाराची वेळोवेळी तपासणी केल्यास तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही. त्याचबरोबर तुमच्या गर्लफ्रेंडला ओरल सेक्स (oral sex) देण्यात काहीही चूक नाही. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जे हवं आहे ते करायला हवं. ओरल सेक्स कोणत्याही प्रकारे किळसवाणं नसून तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला हवा तो आनंद द्याल अशी मला अशा आहे.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या