Home /News /lifestyle /

'तिनं तिच्या EX बॉयफ्रेंडबाबत सर्वकाही सांगितलं पण सेक्सबाबत नाही; त्यांच्यात तसं काही झालं असेल का?'

'तिनं तिच्या EX बॉयफ्रेंडबाबत सर्वकाही सांगितलं पण सेक्सबाबत नाही; त्यांच्यात तसं काही झालं असेल का?'

मी तिच्यावर खरोखर प्रेम करतो. पण भविष्यात आमच्या वैवाहिक आयुष्यावर हा मुद्दा परिणाम करेल का? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का?

प्रश्न  :  मी 25 वर्षांचा युवक आहे. मी एका लहान शहरात वास्तव्यास आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून मूल्य आणि निष्ठाधारित नात्यांमध्ये वाढलेलो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून माझ्या एका चांगल्या मैत्रिणीसोबत मी रिलेशनशिपमध्ये आहे. मी ज्या शहरात राहतो त्याच शहरात तीदेखील राहते. तिची  कौटुंबिक पार्श्वभूमीही माझ्यासारखीच आहे. आमची चांगली मैत्री असल्याने तिने तिच्या पूर्व आयुष्यातील प्रेमसंबंधाविषयी मला कल्पना दिली आहे. पण तिनं तिच्या एक्स बायफ्रेंडबरोबर सेक्स केलं आहे का याबाबत मला काहीही माहिती नाही. मी तिच्यावर खरोखर प्रेम करतो. भविष्यात आमच्या वैवाहिक आयुष्यावर हा मुद्दा परिणाम करेल का? तसंच ती तिचे भूतकाळातील संबंध विसरून जाईल का?  आयुष्यात वचनबद्धतेशिवाय लैंगिक संबंध ठेवणं योग्य आहे का? मी काही चुकीचा विचार करतो आहे का?  वयाच्या या अपरिपक्व टप्प्यावर मी अनेक प्रश्नांमध्ये गुंतलो असून, याबाबत मला मार्गदर्शन करावं. उत्तर :  भारतात नैतिक संवेदनशीलतेत बरेच बदल झाले आहेत. सध्या आपल्या समाजात विवाहपूर्व किंवा प्रासंगिक लैंगिक संबंध ठेवणं हे तितकंसं गैर मानलं जात नाही. त्याबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. समाज आता हे स्वीकारायला लागला आहे. खरं तर राज्यघटनेनुसार प्रत्येक प्रौढ व्यक्तीस मग त्या व्यक्तीचा विवाह झाला असो अगर नसो त्यास लैंगिक संबंध ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. आपण आपल्या समाजात पाहतो की अनेक तरुण लग्नापूर्वी अनेकदा रिलेशनशिपमध्ये होते असं सांगताना दिसतात. आयुष्यभरासाठी वचनबद्ध न राहता सेक्स करणं ही गोष्ट रिलेशनशिपमधील तरुणांसाठी अगदीच सामान्य आहे. तसंच तुमच्या मैत्रिणीनं तिच्या यापूर्वीच्या पार्टनरशी कोणतीही अपेक्षा न ठेवता लैंगिक संबंध ठेवले, ही बाब देखील सामान्यच म्हणावी लागेल. जोपर्यंत आपण आपल्या नात्यावर कोणताही परिणाम होऊ देत नाही, तोपर्यंत आपल्या पार्टनरच्या भूतकाळातील लैंगिक संबंधाचा आपल्या भविष्यकाळावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. पण जर तुम्हाला काही परिणाम होईल असं वाटत असेल तर तो कशाप्रकारे होईल हे मला समजून सांगू दे. जे काही घडलं तो तिचा भूतकाळ होता, सध्या तर ती तुमच्या सोबत आहे. जो भूतकाळ होता तो भूतकाळ राहिला पाहिजे. तुम्ही जर त्याचाच विचार करीत बसला तर तुमच्या वर्तमान आणि भविष्यकाळावर परिणाम करेल. हे वाचा - Sexual Wellness : "मला Casual Sex हवंय; पण तिच्या मनातलं कसं ओळखू?" तुम्ही प्रथमच रिलेशनशिपमध्ये आहात आणि त्यात पारंपरिक मूल्य महत्त्वाचे असलेल्या कुटुंबातून तुम्ही आलेला आहात, त्यामुळे मी समजू शकते की या सगळ्या गोष्टी सांगणं सोपं आणि करणं अवघड आहे.  अनेक व्यक्तींशी रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या लोकांना देखील आपल्या पार्टनरच्या भूतकाळातील लैंगिक संबंधांविषयी समजल्यावर त्रास होतो, त्यामुळे ते या गोष्टी जाणून घेण्याकडे दुर्लक्ष करतात. तुमचा तर हा पहिलाच संबंध आहे. सद्यस्थितीत तिने तुमची निवड केली आहे आणि हीच तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. भले तिनं भूतकाळात लैंगिक संबंध ठेवले असतील किंवा नसतील. ती तुमच्यावर प्रेम करते आणि तिला तुम्ही हवे आहात म्हणजेच तिच्या आयुष्यात कोणतीही दुसरी व्यक्ती नाही, ही बाब लक्षात घ्या. हे वाचा - Sexual Wellness : 'ओरल सेक्स किळसवाणं वाटतं; ते खरंच सुरक्षित असतं का?' ती तिच्या आयुष्यात आलेले पूर्वानुभव विसरली किंवा नाही, या गोष्टी महत्वाच्या आहेत का? ती जर तिच्या पूर्वआयुष्यातील व्यक्तीला प्राधान्य देत असती तर मग ती तुझ्याबरोबर कशाला आली असती?  तिचं तुमच्यावर प्रेम आहे आणि ती तुमच्याबरोबर आहे याचाच अर्थ असा की भूतकाळातील अनुभव हे आता फक्त भूतकाळातीलच आहेत. अखेरीस, सर्व आठवणींप्रमाणे अशा आठवणी देखील पूर्णतः विस्मृतीत जातील. याचा तुमच्या आणि तिच्यामधील रिलेशनशीपवर कोणातही परिणाम होणार नाही.  जे भूतकाळात घडले आहे, त्याबाबत अधिक विचार न करता. वर्तमानाचा आनंद घ्या आणि भविष्याकडे पाहा.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual relationship, Sexual wellness

पुढील बातम्या