मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /काय आहे भूमी पेडणेकरच्या सुंदर फिगरचे रहस्य? कॉफीमध्ये 'हा' सिक्रेट पदार्थ घालून पिते भूमी

काय आहे भूमी पेडणेकरच्या सुंदर फिगरचे रहस्य? कॉफीमध्ये 'हा' सिक्रेट पदार्थ घालून पिते भूमी

वजन कमी करण्यास मदत करणारे अनेक खाद्यपदार्थ असताना, तुमची आवडती अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) तिचे जास्तीचे वजन कसे कमी केले असेल याचा कधी विचार केला आहे? जाणून घ्या भूमीचा वजन कमी करण्याचा प्रवास कसा होता.

वजन कमी करण्यास मदत करणारे अनेक खाद्यपदार्थ असताना, तुमची आवडती अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) तिचे जास्तीचे वजन कसे कमी केले असेल याचा कधी विचार केला आहे? जाणून घ्या भूमीचा वजन कमी करण्याचा प्रवास कसा होता.

वजन कमी करण्यास मदत करणारे अनेक खाद्यपदार्थ असताना, तुमची आवडती अभिनेत्री भूमी पेडणेकरने (Bhumi Pednekar) तिचे जास्तीचे वजन कसे कमी केले असेल याचा कधी विचार केला आहे? जाणून घ्या भूमीचा वजन कमी करण्याचा प्रवास कसा होता.

मुंबई, 3 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) इतर चित्रपटांव्यतिरिक्त 'दम लगा के हैशा', 'टॉयलेट: अ लव्ह स्टोरी' आणि 'सोनचिरिया' मधील तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. भूमी आता तिच्या सुंदर फिगरने लोकांना भुरळ घालते आहे. एक खवय्या असूनही भूमीने ही सुंदर फिगर मिळवली आहे. वजन कमी करणारे तसे तर अनेक खाद्यपदार्थ असतात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की तुमच्या आवडत्या अभिनेत्रीने कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून आपले वजन कमी केले असेल? आज तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आम्ही आलो आहोत.

भूमीने वजन कमी करण्याच्या प्रवासात ((Inspiring Weight Loss Journey) ) कधीच स्वतःला उपाशी ठेवले नाही. स्टाइलक्रेझच्या रिपोर्टनुसार, भूमीने खुलासा केला की, “जेवणाने मला आनंद होतो. ते आत्म्यासाठी आहे. मला हवे असलेले काहीही खाण्यापासून मी स्वतःला कधीच वंचित ठेवले नाही. माझ्याकडे तूप, लोणी आणि ताक होते आणि मी फक्त साखर घेणे पूर्णपणे बंद केले. पण होय, मी माझ्या कार्बोहायड्रेटचे सेवन देखील नियंत्रित केले. मी माझ्या नियमित आहाराचे (Regular Diet) पालन केले, योग्य पद्धतीने व्यायाम (Exercise) केला. तसेच मी दर पाच दिवसांनी मला हवे ते पदार्थ (Cheat Meal) खायचे.

Hair Care : केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत? अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर

अभिनेत्री कॉफी (Coffee) देखील त्यात तूप (Ghee) टाकून पितात. काही आठवड्यांपूर्वी, भूमीने तिच्या मॉर्निंग कॉफीची रेसिपी (Coffee With Ghee) चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने एका कपमध्ये पाणी, कॉफी पावडर आणि तिचा सिक्रेट इन्ग्रेडियंट तूप टाकले. तिच्या व्हिडिओचे कॅप्शन होते, “घी + कॉफी (कॉफी इमोजी) = मॉर्निंग.”

View this post on Instagram

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

तुम्हालाही होतोय हेयर फॉलचा प्रॉब्लेम? या 5 गोष्टी टाळाच

भूमीने हे देखील सांगितले होते की ती कधीही आहारतज्ज्ञ किंवा पोषणतज्ञांकडे गेली नव्हती. “हे छान वाटतं पण मी कधीच आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञांकडे गेले नाही. आत्तापर्यंत फक्त माझी आई आणि मीच होते. वजन कमी करण्यासाठी मी Google शोध आणि माझ्या आईचे अन्नाबद्दलचे (Food To Lose Weight) अफाट ज्ञान वापरले. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्याव्यतिरिक्त, वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे घरी शिजवलेले साधे जेवण (Home-Cooked Meal). आम्ही दोघांनी एक डाएट प्लॅन तयार केला.” त्यासोबतच दररोज 7 लिटर पाणी प्यायल्यानेदेखील अभिनेत्रीच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना खूप मदत केली आहे.

First published:

Tags: Bhumi pednekar, Health Tips, Lifestyle, Weight loss