Home /News /lifestyle /

तुम्हालाही होतोय हेयर फॉलचा प्रॉब्लेम? या 5 गोष्टी टाळाच

तुम्हालाही होतोय हेयर फॉलचा प्रॉब्लेम? या 5 गोष्टी टाळाच

कुठल्याही व्यक्तीचं सौंदर्य केसांमध्ये (Hair) असतं असं म्हटलं जातं. लांब (Long), दाट (Thick), काळेभोर केस असलेली स्त्री जास्त सुंदर (Beautiful) दिसते तर दाट केस असलेला पुरुषही जास्त हँडसम (Handsome) दिसतो. मात्र, सध्याची धकाधकीची लाइफस्टाईल (Lifestyle), खाण्या-पिण्याच्या सवयी(Eating Habits), प्रदूषण (Pollution), स्ट्रेस, काही अनुवांशिक घटक यांचा परिणाम केसांवर होताना दिसतो.

पुढे वाचा ...
     मुंबई,22 एप्रिल-   कुठल्याही व्यक्तीचं सौंदर्य केसांमध्ये (Hair) असतं असं म्हटलं जातं. लांब (Long), दाट (Thick), काळेभोर केस असलेली स्त्री जास्त सुंदर (Beautiful) दिसते तर दाट केस असलेला पुरुषही जास्त हँडसम (Handsome) दिसतो. मात्र, सध्याची धकाधकीची लाइफस्टाईल (Lifestyle), खाण्या-पिण्याच्या सवयी(Eating Habits), प्रदूषण (Pollution), स्ट्रेस, काही अनुवांशिक घटक यांचा परिणाम केसांवर होताना दिसतो. किशोरवयीन असो किंवा ज्येष्ठ सर्व वयोगटांमध्ये केस गळतीची (Hair fall) समस्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. अनेक तरुणांना तर अकाली टक्कल (Baldness) पडण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. अकाली टक्कल पडल्यानं किंवा मोठ्या प्रमाणात केसगळती होत असल्यास एकूण व्यक्तिमत्त्वावर परिणाम होण्याची भीती असते. काहींचा तर आत्मविश्वास (Confidence) नाहीसा होऊन मानसिक आरोग्यासुद्धा (Mental Health) अस्थिर होतं. अतिरिक्त प्रमाणात केस गळतीचा सामना करणाऱ्या लोकांसाठी डॉक्टर आंचल पंथ (Dr. Aanchal Panth) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही माहिती शेअर केली आहे. डॉ. आंचल या डर्माफोलिक्स स्कीन अँड हेअर ट्रान्सप्लाँट (Dermafollix Skin & Hair Transplant) क्लिनिकमधील डर्मेटोलॉजिस्ट (Dermatologist) आहेत. हर जिंदगी डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डॉ. आंचल पंथ यांनी केस गळतीचा सामना करणाऱ्या लोकांना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळण्याचा सल्ला दिला आहे. केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर टाळा केस गळती होत असलेल्या व्यक्तींनी केमिकलयुक्त शॅम्पूंचा (Chemical Shampoo) वापर टाळला पाहिजे. पण, जर तुमचे केस डॅमेज (Damage) झालेले असतील तर तुम्ही एसएलएस (Sodium Lauryl Sulfate) फ्री शॅम्पू वापरू शकता. यामुळं तुमच्या केसांना डॅमेज प्रोटेक्शन मिळेल. याशिवाय जर तुमचा स्कॅल्प ऑईली (Oily Scalp) असेल तर एसएलएल शॅम्पूच वापरावा लागेल. लहान दातांचा कंगवा वापरू नये लहान दातांचा कंगवा (Comb) वापरल्यास डोक्यातून जास्त केस निघतात. याउलट जर मोठे दात असलेला कंगवा वापरल्यास केसांचं डॅमेज कमी होऊ शकतं. केस ओले असल्यास तर ते विंचरण्यासाठी मोठे दात असलेला कंगवा सर्वोत्तम ठरतो. जर तुमच्या केसांचे क्युटिकल तुटलेले असतील तर फ्रिक्शन कमी करण्यासाठी मोठे दात असलेला लाकडी कंगवा वापरला पाहिजे. जास्त वेळ केसांना हाताळल्यानंही केस गळतीची समस्या उद्भवू शकते. केस ओले असताना हिटिंग टूल्स वापरू नयेत अनेकदा आपल्या केसांना अधिक स्टाईल देण्यासाठी आपण हिटिंग टुल्सचा (Heating Tools) वापर करतो. पण, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ओल्या केसांवर हिटिंग टूल्स वापरले तर केस डॅमेज होतात. ओल्या केसांना हिटिंग टुल्स लावल्यास पाण्याची वाफ तयार होते आणि त्यामुळं केसांचं आणखी नुकसान होते. त्यामुळं हिटिंग टुल्स वापरताना विशेष काळजी घेतली पाहिजे. ब्लीच करू नये जर तुमचे केस गळत असतील तर केसांना लाईट शेडमध्ये कलर करणं टाळलं पाहिजे. केसांना कलर (Hail Color) करण्यापूर्वी ब्लीच (Bleach) केलं जातं. याशिवाय कलरची शेड जितकी लाईट असेल तितक्या जास्त प्रमाणात त्यात हायड्रोजन पेरॉक्साईड (Hydrogen Peroxide) वापरलं जातं. यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा निघून जातो आणि केसांच्या समस्यांमध्ये वाढ होते. केसांना लाईट शेड कलर लावल्यास ड्रायनेस, फ्रिजीनेस, केस तुटणे या समस्या सुरू होतात. जर तुम्हाला केस कलर करायचे असतील तर फक्त रूट टच अप करा. ग्लोबल कलरिंग तुमच्या केसांसाठी जास्त हानिकारक ठरेल. खूप जास्त हेअर ट्रिटमेंट करू नका जर तुमचे केस डॅमेज होण्यास सुरुवात झालेली असेल तर हेअर ट्रिटमेंटचा (Hair Treatment) भडिमार करू नका. एक वर्षापेक्षा जास्त काळ हेअर रिबॉन्डिंग, स्मूदनिंग इत्यादी ट्रिटमेंट घेऊ नये. एका आठवड्यात दोनपेक्षा जास्तवेळा हेअर मास्क वापरू नये जर तुमचे केस खराब होत असतील तर तुम्हाला हेअर मास्क (Hair Mask) वापरण्यास सांगितलं जातं. हेअर मास्कमधून केसांना प्रोटीन आणि हायड्रेशन दोन्हीही मिळतं. परंतु, याचा अर्थ असा नाही की केसांना दररोज मास्क वापरलं पाहिजे. जास्त प्रमाणात हेअर मास्कचा वापर केल्यास केस तुटतात. केसांचा पोत सुधारण्यासाठी तुम्ही मोरोक्कन ऑईल मास्क, आर्गन ऑईल मास्क किंवा अॅलोवेरा हेअर मास्क लावू शकता. वरील सर्व टिप्स तुमच्या केसांशी संबधित समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जर तुमचे केस खूप गळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
    First published:

    Tags: Beauty tips, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या