Home /News /lifestyle /

Hair Care : केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत? अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर

Hair Care : केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत? अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापर

सध्याच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि वाढत्या ताणतणावामुळे लहान वयातच केस खराब होऊ लागतात. आजकाल केस अकाली पांढरे होणे ही एक गंभीर समस्या आहे. तर जाणून घेऊया भोपळ्याचा वापर केस काळे करण्यासाठी कसा करावा.

    मुंबई, 2 जुलै : सुंदर केस (Beautiful Hair) आपल्या व्यक्तिमत्वात भर घालत असतात. म्हणूनच आपले केस दीर्घकाळ निरोगी, सुंदर आणि घनदाट राहावेत अशी आपली इच्छा असते. पण सध्याच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि वाढत्या ताणतणावामुळे लहान वयातच केस खराब होऊ लागतात. आजकाल केस अकाली पांढरे (White Hair) होणे ही एक गंभीर समस्या आहे. आजकाल लहानपणापासूनच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कॉस्मेटिक वस्तूंचा अतिवापर यामुळे केस सहज पांढरे होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही केस नैसर्गिकरित्या काळे (Hair Color) करण्याचा मार्ग शोधत असाल. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरात असलेल्या एका फळभाजीपासून तुम्ही तुमचे केस कसे काळे करू शकता. ही फळभाजी म्हणजे भोपळा. होय, तुम्ही अगदी योग्य वाचले. भोपळा (Bottle Guard) पौष्टिक भाज्यांच्या श्रेणीत मोजला जातो. जाणून घेऊया भोपळ्याचा वापर केस काळे करण्यासाठी कसा करावा. भोपळ्याचे तेल तुमचे केस काळे करण्यासाठी भोपळ्याचे तेल (Bottle Guard Oil) तयार करा. ते बनवण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल लागेल. प्रथम भोपळ्याची साल कापून काही दिवस उन्हात वाळवावी. नंतर एका भांड्यात खोबरेल तेल आणि सुकलेल्या भोपळ्याच्या साली एकत्र उकळा. थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत ठेवा आणि रोज रात्री डोक्याला मसाज करा. सकाळी उठून केस धुवा, काही दिवसात त्याचा परिणाम दिसून येईल. Earth day: आपण सगळे करू शकतो, पृथ्वीला वाचवू शकतो! फक्त 5 गोष्टी आजपासून करूया भोपळ्याचा ज्यूस भोपळ्यामधे व्हिटॅमिन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळते, जर तुम्ही त्याचा ज्यूस (Bottle Guard Juice) करून पिल्यास ते शरीर डिटॉक्स करेल आणि त्याचा परिणाम त्वचेवर आणि केसांवरही होतो. तुम्ही आठवड्यातून 3 दिवस भोपळ्याचा ज्यूस पिल्यास हळूहळू सर्व पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतील. भोपळ्याची साल अनेक वेळा आपण स्वयंपाक करताना भोपळ्याची साल (Bottle Guard Skin) काढून टाकतो. त्यामुळे आपण त्यांच्या फायद्यापासून वंचित राहतो. तुम्ही ही साल बारीक करून त्याचा रस काढा. आता या रसाच्या मदतीने टाळूला मसाज करा आणि नंतर ते कोरडे होण्याची प्रतीक्षा करा. कोरडे झाल्यावर केस धुवा. तुम्हालाही होतोय हेयर फॉलचा प्रॉब्लेम? या 5 गोष्टी टाळाच केसगळतीवरही फायदेशीर तुमचे केस पांढरे होत असतील तसेच केस गळत असतील तर ते थांबवण्यासाठी (Hairfall Tips) तुम्ही भोपळ्याचा ज्यूस वापरू शकता. भोपळ्याचा ज्यूस आपल्या टाळूची छिद्रे उघडून पोषण करतो, त्यामुळे केसांचा ओलावा टिकून राहतो आणि तुटण्याचा धोका नाही. यासोबतच भोपळ्यामधे व्हिटॅमिन बी देखील आढळते जे लाल रक्त पेशी वाढवण्याचे काम करते. त्यामुळे आपल्या टाळूला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि केस मजबूत होतात.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Food, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या