जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोना काळात संशोधनासाठी लाखोंचा निधी; गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का, यावर होणार रिसर्च

कोरोना काळात संशोधनासाठी लाखोंचा निधी; गायत्री मंत्राने कोरोना बरा होऊ शकतो का, यावर होणार रिसर्च

हिंदू संस्कृतीमध्ये गायत्री मंत्राला अनन्यसाधारण महत्व आहे

हिंदू संस्कृतीमध्ये गायत्री मंत्राला अनन्यसाधारण महत्व आहे

सरकराने गायत्री मंत्राने (Gayatri mantra) कोरोना बरा होऊ शकतो का? यावरील संशोधनाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने (Union Ministry of Science) हा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात एम्स (AIIMS) रुग्णालयात संशोधन करण्यात येणार आहे.संशोधनासाठी 3 लाखांचा निधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Second Wave of Corona) देशात हाहाकार माजवलेला आहे. झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. या आठवड्यात कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या जास्त वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यातच दुसरी लाट कमी होत असताना सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट (Corona Third Wave in September) येणार असल्याचंही सांगितलं आहे. कोरोनाच्या चार ते पाच लाट येणार आहेत, अशी माहिती आहे. पहिल्या लाटेचा कहर ओसरायला तीन महिन्याचा काळ लागला. त्यानंतर एप्रिल महिन्यात दुसरी लाट सुरू झाली. एका महिन्यातच रुग्ण संख्या लाखांच्या घरात गेली. त्यामुळे तिसरी लाटही तीव्रतेने पसरेल असा इशारा आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. तर, आरोग्यसेवक आणि सरकारनेही यासाठी तयार रहावं असंही सांगितलं आहे. ( ‘शरीर साथ देईल तोपर्यंत जबाबदारीपासून पळणार नाही’, 2 गर्भवती करतायंत रुग्णसेवा ) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतानाच आरोग्ययंत्रणा कोलमडून गेलेली आहे. कोरोना लसीकरणाला (Vaccination) देशात सुरुवात झाली असली तरी, लसींचा तुटवडा (Shortage of vaccines) जाणवत आहे. प्रौढांबरोबर लहान मुलांनाही संसर्ग होत आहे. आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) विविध उपाय योजना करत आहे.  मात्र या उपाययोजना तोकड्या पडत आहे. उपाययोजना म्हणून लसीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या लाटेच्या वेळी कोरोना सेंटर (Corona Center) उभारण्यात आले. त्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करुन दिला. ( कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी ठरणार अधिक घातक; तज्ज्ञांनी सांगितलं कारण ) मात्र आता सरकराने गायत्री मंत्राने (Gayatri mantra) कोरोना बरा होऊ शकतो का? यावरील संशोधनाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय विज्ञान मंत्रालयाने (Union Ministry of Science) हा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात एम्स (AIIMS) रुग्णालयात संशोधन करण्यात येणार आहे. एम्स रुग्णालयात हे संशोधन (Research) 2 ते 3 महिने सुरु असेल. संशोधनासाठी 3 लाखांचा निधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. यासाठी 20 जणांची निवड केली जाईल. त्यांचे दोन गट बनवले जातील. दोन गटांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाईल. एका गटावर वैद्यकीय उपचार म्हणजे औषधं दिली जातील. तर, दुसऱ्या गटाला आयुर्वेदिक औषधं, योगासनं आणि गायत्री मंत्राचं पठण करण्यास सांगितलं जाणार आहे. त्यांच्यासाठी डॉक्टरांची एक टीम तैनात असणार आहे. अशी माहिती एम्स रुग्णालयाच्या डॉ. रुची दुआ (Dr.Ruchi Dua) यांनी दिली आहे. ( Coronavirus: ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट! अमरावतीमध्ये 110 गावं सील ) हिंदू संस्कृतीमध्ये गायत्री मंत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. या मंत्राला सर्वश्रेष्ठ मंत्र मानल जातं. गायत्री मंत्राच्या उच्चारणामुळे  शरीरात सकारात्मक उर्जा निर्माण होते असा उल्लेख धर्मशास्त्रांमध्ये आहे. यावर संशोधनही करण्यात आलं आहे. मात्र, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक या दोन मतप्रवाहांमुळे त्यावर ठोस भाष्य कोणीही करु शकत नाही. त्यामुळे हे संशोधन किती फायदेशीर ठरेल यांची स्पष्टता नाही. ( नाशिक पोलिसांचं Mission काळाबाजार! टोसिलिझुमॅब 4 लाखाला विकणाऱ्यांचा पर्दाफाश ) देशात कोरोनाचा तीव्र वेगाने होणार प्रसार पाहता, अनेक राज्यामध्ये लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, केरळ सारखी राज्य कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. मदतीसाठी केंद्राकडे मागणी केली जात आहेत. मात्र पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. अशात केंद्रीय विज्ञान मंत्रालयाचा हा संशोधनचा निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात