मराठी बातम्या /बातम्या /nashik /

नाशिक पोलिसांचं Mission काळाबाजार! 40 हजारांचं टोसिलिझुमॅब 4 लाखाला विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिक पोलिसांचं Mission काळाबाजार! 40 हजारांचं टोसिलिझुमॅब 4 लाखाला विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Black Market of Tocilizumab: गेल्या महिनाभरापासून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन, इंजेक्शन आणि अगदी लशींचा देखील तुटवडा आहे. अशावेळी या घटकांचा काळाबाजार रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आणि प्रशासनासमोर आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
नाशिक, 06 मे: कोरोना रुग्णसंख्येत वाढ (Corona Cases in India) झाल्याने गेल्या महिनाभरापासून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामध्ये ऑक्सिजन, इंजेक्शन आणि अगदी लशींचा देखील तुटवडा जाणवत आहे. परिणामी या घटकांचा काळाबाजार होत आहे. देशभरातून अशी अनेक प्रकरणं समोर आल्यानं खळबळ उडाली होती. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार (Blcak Market of Remdesivir Injection) रोखताना पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा यांच्या अगदी नाकीनऊ येत आहेत. तरी देखील दररोज विविध भागातून नवनवीन प्रकरणं समोर येतंच आहेत. अत्यावश्यक गटात मोडणारी औषधे चढ्या दराने काळ्याबाजारात विक्री करताना वारंवार आढळून येत आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी गंगापूर रोडवर उघडकीस आला. या ठिकाणी एका रुग्णालयाच्या बाहेर टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार (Black Market of Tocilizumab) करण्यासाठी काही संशयित येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाला मिळाली होती. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्या सतर्कतेमुळे इंजेक्शनचा काळा बाजार करणार रॅकेट गजाआड झालं आहे. हे वाचा-हा आठवडा सांभाळा! सर्वोच्च आकडेवारीचा 'हाय अलर्ट',नंतर अशी कमी होणार रुग्णसंख्या पोलिसांच्या या पथकाने अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी सापळा रचला. त्यांनी बनावट ग्राहक तयार करुन संशयितांसोबत संपर्क करत ठरलेल्या ठिकाणी बोलविण्यात आले. त्याठिकाणी एका स्विफ्ट कारमधून (एम एच15 एफ एन5055) संशयित प्रणव केशव शिंदे (24, लक्ष्मणरेखा सोसायटी, पंचवटी), संकेत अशोक सावंत (25, रा.न्यू तेजश्री अपार्टमेंट,  मखमलाबाद नाका, पंचवटी) हे दाखल झाले. यावेळी बनावट ग्राहकाने मागणी करत इंजेक्शन ताब्यात घेतले. हे वाचा-VIDEO: डोक्यावर कलश पण तोंडाला मास्क नाही, हजारो महिला पोहोचल्या मंदिरात यानंतर अन्न औषध प्रशासनासाच्या निरीक्षकांनी कारमध्ये बसलेल्या तरुणांना औषधविक्रीचा परवाना मागितला असता त्यांनी नकार दिला. यावेळी पोलिसांनी कारला घेराव घालत दोघांना ताब्यात घेतले. यावेळी प्रणवची झाडाझडती घेण्यात आवी, त्यावेळी त्याच्याकडे 40 हजार 600 रुपये किंमतीचे एक इंजेक्शन पोलिसांना मिळाले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 3 लाखांची मोटार, आठ हजारांची रोख रक्कम, महागडे मोबाईल असा सुमारे 4 लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. औषध निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. याप्रकरणी त्यांचे दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत असून त्यांनाही लवकर अटक केली जाईल
First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona updates, Coronavirus

पुढील बातम्या