मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus: ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट! अमरावतीमध्ये 110 गावं सील

Coronavirus: ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट! अमरावतीमध्ये 110 गावं सील

कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेमध्ये शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागांना तितकासा फटका बसला नव्हता. मात्र दुसरी लाट (Second Wave of COVID-19) अधिकच भयंकर असल्यानं ग्रामीण भागातही (Corona is Spreading in Rural area) कोव्हिडमुळे हाहाकार माजला आहे.

पुढे वाचा ...

अमरावती, 06 मे: राज्याभोवती कोरोनाचा विळखा (Coronavirus in Maharashtra) अधिकच घट्ट होऊ लागला आहे. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेमध्ये शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागांना तितकासा फटका बसला नव्हता. मात्र दुसरी लाट (Second Wave of COVID-19) अधिकच भयंकर असल्यानं ग्रामीण भागातही (Corona is Spreading in Rural area) कोव्हिडमुळे हाहाकार माजला आहे. अमरावती जिल्ह्यातही (Corona Cases in Amravati) अशीच काहीशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात स्फोट व्हायला लागलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण 110 गावं सील करण्यात आलेली आहे, त्यामुळे याठिकाणी कोरोनाचं संकट किती मोठ्या पातळीवर आहे हे लक्षात येईल.

अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागात एकूण 31,413 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यापैकी 521 कोरोणा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे मंगळवारी जिल्ह्यात 1123 करुणा ग्रस्तांची नोंद झाली, यात अमरावती शहरात केवळ 249 तर ग्रामीण भागात 974 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

हे वाचा-मोठी बातमी! RLD अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचं कोरोनामुळे निधन

कोरोना साखळी खंडित (Break the Chain) करण्यासाठी हॉटस्पॉट असणारी एकशे दहा गावे सील करण्यात आली आहेत. मेळघाटातील धारणी तालुक्यातील मध्यप्रदेश लगतच्या सर्व बॉर्डर सील करण्यात आलेल्या आहेत. सोबतच धारणी तालुक्यातील दहा गावे सुद्धा सील करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दिली आहे. धारणी तालुक्यात गावागावात जाऊन कोरोना चाचणी अभियान राबविण्यात येत आहे, धारणी तालुक्यात आज रोजी 283 रुग्ण आहेत.

हे वाचा-पुण्यातील गणेश मंडळांचा लहानग्यांसाठी पुढाकार, घरपोच मोफत पुस्तकांचं वाटप

जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांचा मतदार संघ असलेल्या तिवसा तालुक्यात 150 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे तिवसा तालुक्यातील तिवसा शहर आणि ग्रामीण भागातील दहा गावे सील करण्यात आलेली आहेत. तिवसा तालुक्यात बाजार व किराणा दुकान देखील बंद करण्यात आल्याची माहिती तिवसा तहसीलदार वैभव फडतारे यांनी दिली आहे.

First published:

Tags: Amravati, Coronavirus, Coronavirus cases, Covid-19