Home /News /coronavirus-latest-news /

'शरीर साथ देईल तोपर्यंत जबाबदारीपासून पळणार नाही', या 2 गर्भवती नर्स करतायंत कोरोना रुग्णांची अविरत सेवा

'शरीर साथ देईल तोपर्यंत जबाबदारीपासून पळणार नाही', या 2 गर्भवती नर्स करतायंत कोरोना रुग्णांची अविरत सेवा

बिहारमधल्या (Bihar) कटिहार (Katihar) याठिकाणी कार्यरत असलेल्या या नर्स गर्भवती असूनही अतिदक्षता विभागात (ICU) कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. सुलेखा (Sulekha) आणि सोनी (Soni) अशी त्या दोघींची नावं आहेत.

    कटिहार (बिहार), 06 मे : सध्याच्या कोरोनाच्या काळात (Corona Pandemic) संपूर्ण देशावर भीतीचं सावट आहे. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी-अधिकारी आणि अन्य कोरोना योद्धे या काळातही आपल्या जीवावर उदार होऊन जबाबदारी निभावत आहेत. बिहारमधली अशाच दोन महिला योद्ध्यांची (Lady Corona Warriors) कहाणी प्रेरक आहे. बिहारमधल्या (Bihar) कटिहार (Katihar) याठिकाणी कार्यरत असलेल्या या नर्स गर्भवती असूनही अतिदक्षता विभागात (ICU) कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. सुलेखा (Sulekha) आणि सोनी (Soni) अशी त्या दोघींची नावं आहेत. कटिहार जिल्हा आरोग्य विभागात (District Health Department) या दोघी नर्स म्हणून कार्यरत आहेत. कटिहारमधल्या लसीकरण केंद्रावर त्यांची ड्युटी लावण्यात आली होती; मात्र दरम्यानच्या काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागल्यामुळे अतिदक्षता विभागात कर्मचाऱ्यांची उणीव भासू लागली. त्यामुळे त्या दोघींची तिथे नियुक्ती करण्यात आली. कोरोनासारख्या (Corona) गंभीर संसर्गाचा धोका असूनही त्यांनी स्वतःची जबाबदारी टाळली नाही. त्या झोकून देऊन आपलं काम करत आहेत. सुलेखा सात महिन्यांची गर्भवती असून एका दिवसापूर्वीच तिचा स्वतःचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ती काहीशी तणावात आहे; पण तिला दुःख या गोष्टीचं आहे, की आपण यापुढे सेवा देऊ शकणार नाही. हे वाचा-Coronavirus: ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट! अमरावतीमध्ये 110 गावं सील सोनी सहा महिन्यांची गर्भवती आहे. सुलेखाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मनात भीती तर आहेच; पण कर्तव्यापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाही, असं ती म्हणते. जोपर्यंत शरीर साथ देईल, तोपर्यंत या जबाबदारीपासून दूर पळणार नाही, असं ती म्हणते. कटिहारच्या हॉस्पिटलचे मॅनेजर भवेशकुमार यांनी सांगितलं, की एका दिवसापूर्वीच सुलेखाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तिला रजा देण्यात आली आहे. तिच्यावर उपचारांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधांकरिता आरोग्य विभागाचं बारकाईने लक्ष असेल. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं, की कटिहारच्या आरोग्य विभागासाठी अन्य कर्मचाऱ्यांबरोबरच या दोन महिला कर्मचाऱ्यांचा आदर्श ठेवण्यासारखा आहे. ज्या काळात आपले लोकही आपल्यापासून तोंड फिरवतात, अशा काळात आपल्या पोटात बाळ असतानाही या दोघी लोकांच्या सेवेसाठी झटत आहेत, हे कौतुकास्पद आहे, असे उद्गार त्यांनी काढले. हे वाचा-कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी ठरणार अधिक घातक; तज्ज्ञांनी सांगितलं कारण दरम्यान, सुरतमध्येही नॅन्सी आयजा मिस्त्री (Nancy Ayeza Mistry) नावाची चार महिन्यांची गर्भवती असलेली एक नर्स कोरोनाग्रस्तांची देखभाल करून मानवतेचा धर्म निभावत आहे. एवढंच नव्हे, तर सध्या सुरू असलेल्या मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त दिवसभर रोजा ठेवून ती आपल्या धर्माचंही पालन करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्याबद्दलचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. 'मी नर्स म्हणून माझं कर्तव्य करत आहे. माझ्यासाठी लोकांची सेवा हीच पूजा, उपासना आहे,' अशी तिची भावना आहे. अशा भावनेतून काम करणाऱ्या हजारो कोरोना योद्ध्यांमुळेच देशाचा हा भयावह काळ थोडा सुसह्य होतो आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Corona hotspot, Corona patient, Coronavirus, Health, Pregnent women, Woman doctor

    पुढील बातम्या