जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दोन टप्प्यात शनी येतोय कुंभ राशीत; दीर्घकाळापासून संकटांचा मारा झेलणाऱ्यांना मिळेल दिलासा

दोन टप्प्यात शनी येतोय कुंभ राशीत; दीर्घकाळापासून संकटांचा मारा झेलणाऱ्यांना मिळेल दिलासा

दोन टप्प्यात शनी येतोय कुंभ राशीत; दीर्घकाळापासून संकटांचा मारा झेलणाऱ्यांना मिळेल दिलासा

कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या त्रासातून मुक्तता मिळेल. मकर राशीची साढेसाती आता अंतिम टप्प्यात आली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) शनि दर अडीच वर्षांनी राशी बदलतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल : 30 वर्षांनंतर, 29 एप्रिल रोजी शनि ग्रह त्याच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत प्रवेश करत आहे. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीकोनातून ही एक महत्त्वाची घटना आहे. ज्याचा सामान्य माणसाच्या जीवनावरही खोलवर परिणाम होऊ शकतो. हिंदुस्थान टाईम्स ने दिलेल्या बातमीनुसार, शनीच्या कुंभ राशीत बदलामुळे धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. दुसरीकडे मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू होईल. मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका होईल. कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनीच्या त्रासातून मुक्तता मिळेल. मकर राशीची साढेसाती आता अंतिम टप्प्यात आली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) शनि दर अडीच वर्षांनी राशी बदलतो. अशा प्रकारे, संपूर्ण भचक्र भ्रमण करण्यासाठी त्यांना 30 वर्षे लागतात. दोन टप्प्यात कुंभेत प्रवेश - शनि कुंभ राशीत दोन टप्प्यात प्रवेश करत आहे. प्रथम, शनिदेव 29 एप्रिल ते 4 जून या कालावधीत कुंभ राशीत मार्गी आणि 4 जून ते 12 जुलैपर्यंत वक्री अवस्थेत असतील. 13 जुलै रोजी शनि मकर राशीत परत येईल. तो 17 जानेवारी 2023 पर्यंत मकर राशीत राहील. या दिवसापासून शनी पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 29 मार्च 2025 पर्यंत कुंभ राशीत जाईल. याचा कोणाला लाभ होणार जाणून घेऊया. हे वाचा -  केसांना डाय केल्यानंतर लवकर रंग फिका पडतोय? या 4 चुका तुमच्याकडून होत असतील मेष : पद, प्रतिष्ठा, उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित होतील. कर्क : अनावश्यक खर्च वाढेल, पत्नीच्या आरोग्यावर परिणाम होईल. सिंह: आर्थिक प्रगती, भागीदारी व्यवसायातून लाभ कन्या : नोकरी योग, आर्थिक संकटं दूर होतील तूळ : जमीन व वाहनाचे सुख, संतती प्राप्तीचे योग. हे वाचा -  घरात आनंदी वातावरण, स्ट्रेस होतो कमी; बेडरूममध्ये ही इनडोअर प्लांट्स लावून पाहा वृश्चिक: ग्रहांचा त्रास वाढेल, आईच्या आरोग्यावर परिणाम होईल धनु: नशीब साथ देईल, आर्थिक बाजू मजबूत राहील. मकर : संचित संपत्तीत वाढ, कर्जापासून मुक्ती कुंभ: आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील, पदोन्नतीचे योग मीन: मानसिक त्रास, संघर्षानंतर यश मिळेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात