मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घरात राहतं आनंदी वातावरण, स्ट्रेस आपोआप होतो कमी; बेडरूममध्ये ही इनडोअर प्लांट्स लावून पाहा

घरात राहतं आनंदी वातावरण, स्ट्रेस आपोआप होतो कमी; बेडरूममध्ये ही इनडोअर प्लांट्स लावून पाहा

Bedroom Plants: तुम्ही तुमच्या खोलीत अशा वनस्पती सहज लावू शकता. खोलीत इनडोअर प्लांट ठेवल्यानं तुम्हाला नेहमी फ्रेश वाटतं आणि तणावही कमी होतो. तुमच्या घराच्या भोवती प्रदूषण जास्त असेल तर घरात अशी रोपं नक्की लावा. ते हवेतील विषारी घटक फिल्टर करतात.

Bedroom Plants: तुम्ही तुमच्या खोलीत अशा वनस्पती सहज लावू शकता. खोलीत इनडोअर प्लांट ठेवल्यानं तुम्हाला नेहमी फ्रेश वाटतं आणि तणावही कमी होतो. तुमच्या घराच्या भोवती प्रदूषण जास्त असेल तर घरात अशी रोपं नक्की लावा. ते हवेतील विषारी घटक फिल्टर करतात.

Bedroom Plants: तुम्ही तुमच्या खोलीत अशा वनस्पती सहज लावू शकता. खोलीत इनडोअर प्लांट ठेवल्यानं तुम्हाला नेहमी फ्रेश वाटतं आणि तणावही कमी होतो. तुमच्या घराच्या भोवती प्रदूषण जास्त असेल तर घरात अशी रोपं नक्की लावा. ते हवेतील विषारी घटक फिल्टर करतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 एप्रिल : अलिकडे लोक इनडोअर प्लांट्सचा (Indoor Plants) खूप वापर करू लागले आहेत. पूर्वीच्या काळी लोकांच्या घराबाहेर मोठी बाग असायची पण आता लोक छोट्या फ्लॅटमध्ये राहू लागले आहेत. त्यामुळे बाल्कनीमध्ये आणि खोलीच्या आत इनडोअर रोपटी लावली जात आहेत. लोक लिव्हिंग रूमला हवा शुद्ध करणार्‍या आणि सुंदर दिसणार्‍या इनडोअर प्लांट्सने सजवतात. बेडरूममध्ये इनडोअर प्लांट्स ठेवणं खूप फायदेशीर आहे. ऑक्सिजनची पातळी (Oxygen Level) योग्य ठेवण्यासाठी आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी घरात अनेक प्रकारची रोपे ठेवली जातात, परंतु बेडरूममध्येही काही चांगले इनडोअर प्लांट्स असणे खूप गरजेचे आहे. घरातील ही झाडं फक्त घराचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर हवा शुद्ध करतात आणि लोकांना अनेक आजारांपासून वाचवतात. काही इनडोअर प्लांट्स आहेत ज्यांना जास्त प्रकाशाचीही गरज (Bedroom Indoor Plants) नसते.

तुम्ही तुमच्या खोलीत असे प्लांट सहज लावू शकता. खोलीत इनडोअर प्लांट ठेवल्यानं तुम्हाला नेहमी फ्रेश वाटतं आणि तणावही कमी होतो. तुमच्या घराच्या भोवती प्रदूषण जास्त असेल तर घरात अशी रोपं नक्की लावा. ते हवेतील विषारी घटक फिल्टर करतात. घराच वाढणारी ही रोपटी अनेकांना आवडतात कारण त्यांना जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नसते. काही झाडं अनेक दिवस पाण्याशिवाय जगू शकतात. आज आम्ही तुम्हाला काही इनडोअर प्लांट्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता. यामुळे बेडरूमची हवा शुद्ध होईल, तणाव कमी होईल आणि तुम्ही चांगली झोप घेऊ शकाल.

बांबू पाम -

तुमच्या घरात सूर्यप्रकाश नसेल किंवा तुम्ही सूर्यप्रकाश नसलेल्या छोट्या फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही घरात बांबू पाम लावू शकता. ट्रायक्लोरेथिलीन आणि बेंझिनसारखे हानिकारक घटक सध्या हवेत आढळतात, ते फिल्टर करण्यासाठी ही वनस्पती उपयुक्त आहे. काही हानिकारक घटक फर्निचरमधून बाहेर पडत असतात त्यासाठी देखील ही वनस्पती उपयोगी आहे. बेडरूममध्ये असलेल्या फर्निचरच्या शक्यतो आसपास ठेवा.

स्‍नेक प्‍लांट -

स्नेक प्लांटमुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. शिवाय स्नेक प्लांटची जास्त देखभाल करण्याची गरज नसते. ते अनेक दिवस पाण्याशिवाय सहज जगू शकतं.

हे वाचा  - गॅस, अपचनवर औषधांचा मारा नको; ही 5 फऴं पोटाच्या विकारांवर आहेत फायदेशीर

पीस लिली -

पीस लिली वनस्पती ट्रायक्लोरेथिलीन आणि बेंझिनपासून हवा शुद्ध करण्यासाठी उपयोगी आहे. ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे किंवा ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत आहे, त्यांनी विशेषतः बेडरूममध्ये ही वनस्पती लावावी. ही वनस्पती कमी प्रकाशात सहज जगू शकते. घरामध्ये केमिकल-आधारित एअर फ्रेशनर्स वापरण्याऐवजी तुम्ही पीस लिली वापरू शकता. त्याच्या सुगंधाने मूड फ्रेश होतो आणि चांगली झोपही लागते.

ऑर्किड वनस्पती

ऑर्किड प्लांट आपल्या सुंदर फुलांनी बेडरूमला तर खास बनवतंच, पण बेडरूममध्ये ठेवल्याने हवा देखील शुद्ध होते. हवेत xylene आणि toluene नावाची दोन संयुगे आढळतात जी आरोग्यासाठी चांगली मानली जात नाहीत. जर तुम्ही खोलीत ऑर्किडचे रोप ठेवले तर ते हवेतील ही दोन्ही संयुगे फिल्टर करतं आणि हवा स्वच्छ होते.

हे वाचा - दातांवर उपचारानंतर भलतंच घडलं; फुफ्फुसाचा रिपोर्ट पाहून रुग्णाला बसला धक्का

वीपिंग फीग -

वीपिंग फीग वनस्पतीला सुंदर पांढरी फुलं येतात. ही वनस्पती दीर्घकाळ टिकते. यासोबतच तुमच्या खोलीत धुळीचे कण असतील तर ते हवेतून बाहेर काढण्यास मदत त्यामुळे मदत होते. अनेकांना धुळीची अ‌ॅलर्जी असते, त्यांच्यासाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Personal life