जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / केसांना डाय केल्यानंतर थोड्या दिवसातच रंग फिका पडतोय? या 4 चुका तुमच्याकडून होत असतील

केसांना डाय केल्यानंतर थोड्या दिवसातच रंग फिका पडतोय? या 4 चुका तुमच्याकडून होत असतील

केसांना डाय केल्यानंतर थोड्या दिवसातच रंग फिका पडतोय? या 4 चुका तुमच्याकडून होत असतील

केसांना डाय केल्यानंतर रंग थोड्याच दिवसात फिका पडू लागला की, तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. म्हणूनच, केसांचा रंग दीर्घकाळ टिकवण्याचे उपाय (Long lasting hair color Tips) जाणून घेऊयात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 एप्रिल : केसांना सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी लोक कित्येक उपाय करतात. त्याचबरोबर केसांना नैसर्गिक लुक देण्यासाठी वेळोवेळी डाय केलं जातं. काही लोक वेळेअभावी घरीच केसांना कलर (hair color) करतात, तर अनेक जण केसांना कलर करण्यासाठी सलूनमध्ये जाणे पसंत करतात. पण केसांना कलर करताना अनेक वेळा आपण काही कॉमन चुका करतो, ज्यामुळे केसांचा रंग कमी कालावधीत निघून जातो. केसांचा रंग दीर्घकाळ टिकण्यासाठी तुम्ही काही टिप्स वापरून पाहू शकता. केसांना डाय केल्यानंतर रंग थोड्याच दिवसात फिका पडू लागला की, तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. म्हणूनच, केसांचा रंग दीर्घकाळ टिकवण्याचे उपाय (Long lasting hair color Tips) जाणून घेऊयात. शॅम्पू वापरू नका - काही लोकांना केस डाय केल्यानंतर शॅम्पूने धुण्याची सवय असते. अशा परिस्थितीत तुमच्या केसांमध्ये असलेले हेअर क्युटिकल रंग लॉक करू शकत नाही आणि तुमच्या केसांचा रंग लवकर क्षीण होऊ लागतो. त्यामुळे केसांना डाय केल्यानंतर 72 तास म्हणजे 3 दिवस केसांवर शॅम्पू वापरणं टाळा. हे वाचा -  किरकोळ वाटणाऱ्या या 5 सवयी आरोग्य बिघडवतात; भविष्यात होतात गंभीर आजार असे धुवा केस - केसांना कलर लावल्यानंतर केस धुण्यासाठी सल्फेट फ्री शॅम्पू वापरा. तसेच, पाण्यात असलेल्या केमिकल्स आणि क्लोरीनपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी फिल्टर पाण्याने केस धुवा. गरम पाण्याने केस धुवू नका. यामुळे तुमच्या केसांचा ओलावा निघून जाईल आणि केसांचा रंगही लवकर उडेल. कंडिशनर वापरा - केसांना डाय लावल्यानंतर शॅम्पू करण्यापूर्वी केसांना कंडिशनर लावा. कंडिशनर तुमच्या केसांचा रंग आणि आर्द्रता लॉक करेल. त्यामुळे रंग जास्त काळ निघणार नाही. हे वाचा -  मजबूत, घनदाट केसांसाठी काळ्या तिळाचं तेल वापरा; चांगला परिणाम काही दिवसात दिसेल हीटिंग टूल्स वापरू नका - केसांना डाय केल्यानंतर केसांवर हीटिंग टूल्सचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा. हीटिंग टूल्स वापरल्याने केसांचा रंग फिका पडू लागतो. तसेच सूर्यकिरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी बाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फ घालण्यास विसरू नका. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात