पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची Fertility वयाबरोबर कमी का होते? कुठल्या वयात गर्भधारणा चांगली?

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची Fertility वयाबरोबर कमी का होते? कुठल्या वयात गर्भधारणा चांगली?

बाळ सुदृढ जन्माला येण्यासाठी योग्य वयात गर्भधारणा होणच आवश्यक आहे. योग्य वयात बाळाचं प्लॅनिंग करायला हवं. करियर आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतातच. पण, कॉम्पिलेकेशन टाळायचे असतील. तर, योग्य वयात योग्य निर्णय घ्या.

  • Share this:

दिल्ली,  5 मे : नोकरी, करियऱ, आर्थिक स्थिरता याच्या मागे धावत असताना आताच्या काळात आईवडील होण्याचं वय मागे पडू लागलेलं आहे. जेव्हा करियर (Career) स्थिर होतं तेव्हा, बाळाचा विचार केला जातो. पण, वय वाढलं असल्याने गर्भधारणेत अडचणी येतात. कारण, स्त्री आणि पुरुष दोघांनाही निसर्गाने प्रजनन क्षमतेचं (Fertility) एक ठराविक वय दिलेलं आहे. वयानुसार महिला आणि पुरुष यांच्या प्रजनन क्षमता वेगळा परिणाम होतो. एक स्त्री जन्माला येतानाच स्त्रीबीजांसह जन्माला येते. काही कालावधीतनंतर ती कमी होत जातात आणि काही काळानंतर ती आणखी स्त्रीबीज (Ovum) तयार करू शकत नाही

महिलांना आपल्या प्रजनन क्षमतेची मर्यादा माहित असते म्हणजेच बयोलॉजिकल क्लॉकची माहिती असते. विषेश करुन प्रेग्नेन्सी प्लॅन करताना आपल्या प्रजनन क्षमतेचा विचार करावा लगातो.बाळ जन्माला घालताना स्त्री आणि पुरुष यांच्या प्रजनन क्षमतेचा विचार करुनच बाळ जन्माला घालण्याचा विचार करायला हवा. बाळ सुदृढ जन्माला येण्यासाठी योग्य वयात गर्भधारणा (Pregnancy) होणच आवश्यक आहे.

(Cuteness Overload! अमृता खानविलकरने शेअर केलेला या छोटू 'टेडी बेअर'चा VIDEO पाहू)

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर वयाचा परिणाम होतो?

पुरुष आणि स्त्रियांवरच्या प्रजनन क्षमतेवर वयाचा भिन्न प्रभाव पडतो. एक स्त्री काही विशिष्ट स्त्रीबीजांसहजन्माला येते काही कालावधीत स्त्रीबीजांची संख्या कमी होते आणि काही काळानंतर आणखी स्त्रीबीज तयार करू शकत नाही. पण पुरुषांच्या बाबतीत विचार करता पुरुषांमध्ये आयुष्यभर शुक्राणू (Sperm) तयार करण्याची क्षमता असते. त्यामुळेच, एखाद्या पुरुषाच्या तुलनेत महिलांची बाळ जन्माला घालण्याची क्षमता कमी असते. पुरुष 60 ते 70व्या वयातही मूल जन्माला घालू शकतात. जाणून घेऊया वेगवेगळ्या वयोगटात प्रजनन क्षमता किती असते...

(कंगनाची (Twitter) बोलती बंद! अभिनेत्रीविरोधात पोलिसात तक्रार दाखल)

20 व्या वर्षात प्रजनन क्षमता

तज्ज्ञांच्या मते, निरोगी गर्भधारणेसाठी स्त्रीचे हे योग्य वय आहे. या वयात गर्भधारणा होण चांगलं. 20 व्या वयात किंवा त्यानंतर प्रजनन क्षमता चांगली असते.

या वयोगटातील गर्भधारणेचे काही मोठे फायदे .

या वयात अंड्यांमध्ये अनुवांशिक विकृती असण्याची शक्यता कमी असल्याने, बाळाला डाउन सिंड्रोम, थॅलेसीमिया असे जेनेटिक विकार होण्याची शक्यता कमी असते.

गर्भपात होण्याचा धोका केवळ 10 टक्के  असतो.

(Shark Vs shark : समुद्रात रंगलं युद्ध; लढाईचा थरारक VIDEO VIRAL)

अवेळी बाळ जन्माला येणं किंवा बाळाचं वजन कमी असण्याची शक्यता कमी असते.

आईलाही मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या होण्याचा धोका कमी असतो.

या काळातल्या गर्भधारणेचे तोटे

पहिल्या गरोदरपणात, प्री-एक्लेम्पसिया, गुंतागुंतची गर्भधारणा होण्याचा धोका जास्त असतो.

पीसीओडी किंवा फायब्रॉईड असल्यास, गर्भधारणा होणे अवघड होते. .

('लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री रुचिता जाधव अडकली लग्नबंधनात.... पाहा PHOTO)

पुरुषांच्या प्रजनन क्षमतेचा विचार करात चिंता करण्याची अजिबात गरज नसते. जरी एखाद्या पुरुषामध्ये वंध्यत्वाचं निदान झालं असेल तर, तेही त्याच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब किंवा कोणताही लैंगिक संसर्ग आणि मधुमेह यामुळे असू शकतं. त्यामुळे पुरुषांमधील शुक्राणूंच्या गतिशीलतेवर परिणाम होतो.

वयाच्या तिशीतील प्रजनन क्षमता

एखाद्या स्त्रीला आपल्या वयाच्या तिशीत गर्भधारणा करायची असेल तर, ती होण्याची शक्यता तिच्या या वयात 15 ते 20 टक्क्यांनी कमी असते त्यातही तिला कोणातेही हेल्थ इश्यु नसावेत. एका अभ्यासानुसार स्पष्ट झालं आहे की, 30 व्या वर्षातील महिलांमध्ये पहिली गर्भधारणा होण्याची शक्यता 30 टक्के आहे. परंतु, जेव्हा स्त्रीबीजाची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होत जाते किंवा तेव्हा एखादी स्त्री पस्तीशीपर्यंत पोचते तेव्हा प्रजनन क्षमता कमी होते. 35 नंतर नैसर्गिकरित्या गर्भवती होण्याची शक्यता देखील कमी आहे. या वयात हार्मोनल इम्बॅल्समुळे जुळे किंवा तिळं होण्याची अधिक असते.

(कोरोनाकाळात घरबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 50 हजार कमाई)

तिशीत गर्भवती होण्याचे परिणाम

सी-सेक्शनचा उच्च रेट.

नवजात बाळामध्ये अनुवांशिक समस्यांची शक्यता जास्त गर्भपाताची शक्यता जास्त.

एक्टोपिक प्रेग्नेन्सीची शक्यता जास्त.

चाळीशीनंतर गर्भधारणा

चाळीशीतली गर्भधारणा या वयात महिलांची गर्भधारणेची शक्यता कमीच असते.

40 ते 45 दरम्यान गर्भधारणेची शक्यता 5 टक्केच असते.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनुसार, जगभरातील निम्म्या स्त्रीया चाळीशीनंतर गर्भधारणा करू शकत नाहीत. त्यामुळेच योग्य वयात बाळाचं प्लॅनिंग करायला हवं. करियर आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतातच. पण, कॉम्पिलेकेशन टाळायचे असतील. तर, योग्य वयात योग्य निर्णय घ्या.

Published by: News18 Desk
First published: May 5, 2021, 7:32 AM IST

ताज्या बातम्या