कोरोनाकाळात घरबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 50 हजार कमाई, सरकारही करेल मदत

कोरोनाकाळात घरबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 50 हजार कमाई, सरकारही करेल मदत

गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक घरात केचअप आणि सॉसची मागणी असतेच. लहान मुलांना तर हे खूप आवडतं. त्यामुळे कोरोना काळात घरीच तुम्ही या बिझनेसची सुरुवात करू शकता आणि चांगला नफा कमवू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मे : तुम्ही घरबसल्या कोणता बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही टोमॅटो केचअप आणि सॉस (tomato sauce manufacturing unit)तयार करण्याचा बिझनेस सहज करू शकता. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक घरात केचअप आणि सॉसची मागणी असतेच. लहान मुलांना तर हे खूप आवडतं. त्यामुळे कोरोना काळात घरीच तुम्ही या बिझनेसची सुरुवात करू शकता आणि चांगला नफा कमवू शकता.

घर, हॉटेल, रेस्टॉरंट, कँटिन आणि प्रत्येक फूड स्टॉलवर टोमॅटो केचअप आणि सॉस आढळतोच. याच्या वापराशिवाय खाण्याचे पदार्थ पूर्ण होत नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज भासणार नाही. या बिझनेसमधून तुम्ही महिन्याला 50 हजार रुपये कमावू शकता.

ऑनलाइन लायसन्स -

हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुमच्याजवळ लायसन्स असणं आवश्यक आहे. हे लायसन्स fssai कडून घ्यावं लागतं. तुम्ही लायसन्स ऑनलाइन अर्ज करून घेऊ शकता. यासाठी 10 ते 15 दिवसांचा वेळ लागेल.

सर्टिफिकेशन कोर्स -

सॉस बनवण्यासाठी 5 कामगारांची आवश्यकता असते. मात्र, प्रॉडक्ट मार्केटिंगसाठी तुम्हाला 4 ते 5 जण कामावर ठेवावे लागतील. तसंच ज्यांना हा बिझनेस सुरू करायचाय त्यांना एखाद्या सॉस मॅन्युफॅक्चरर जवळ 6 महिने काम शिकावं लागेल. याशिवाय एखाद्या संस्थेतून तुम्ही फूड प्रोसेसिंगचा सर्टिफिकेशन कोर्स करू शकता.

(वाचा - दररोज 50 रुपयांची गुंतवणूक करुन कमावू शकता 50 लाख रुपये;जाणून घ्या काय आहे योजना)

या बिझनेससाठी किती लोन मिळतं -

हा बिझनेस सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला कमी व्याज दरात 50 हजार ते 10 लाखांपर्यंत लोन मिळू शकतं. मात्र, लोन घेण्यासाठी तुम्हाला लायसन्स दाखवावं लागेल. या योजनेअंतर्गत लहान-मोठे उद्योग सुरू करण्यास इच्छूक असणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. तसंच कमी व्याज दरात लोन उपलब्ध करून दिलं जातं.

बिझनेस सुरू करण्यासाठी कोणती साधनं लागणार -

- सॉस मॅन्युफॅक्चरिंगसाठी तुमच्याकडे कमीत कमी 2 लाख रुपये असणं आवश्यक आहे.

- कॅटल, मिक्सर, बॉयलर आणि कमर्शियल स्टोव्ह लागेल.

- 9 ते 10 जणांच्या मदतीने सॉस बनवण्याचं काम केलं जाऊ शकतं.

- याशिवाय केवळ 300 चौरस फूट जागेत तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता.

First published: May 4, 2021, 3:00 PM IST

ताज्या बातम्या