जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Cuteness Overload! अमृता खानविलकरने शेअर केलेला या छोटू 'टेडी बेअर'चा VIDEO पाहून काय म्हणाल?

Cuteness Overload! अमृता खानविलकरने शेअर केलेला या छोटू 'टेडी बेअर'चा VIDEO पाहून काय म्हणाल?

Cuteness Overload! अमृता खानविलकरने शेअर केलेला या छोटू 'टेडी बेअर'चा VIDEO पाहून काय म्हणाल?

अमृता खानविलकरने हा गोड VIDEO शेअर करत कॅप्शन सुचवा असं म्हटलं आहे. सोनाली खरे, स्पृहा जोशी अशा तिच्या अनेक सेलेब्रिटी मित्र-मैत्रिणींनी त्यावर काय काय सुचवलंय पाहा…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 4 मे : लहान मुलं ही सगळ्यांचीच लाडकी असतात. तर त्यांचे बोबडे बोल हे अगदी कानांना सुखावणारे असतात. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर रोज पाहतो. पण अभिनेत्री अमृता खानविलकरही (Amruta Khanvilkar) एका लहानग्याची फॅन आहे. टेडी बेअर असं म्हणायचा प्रयत्न करणारा हा छोटू टेडी बेअरत वाटतोय. त्याच्या बोबड्या बोलांनी तुम्हीही त्याचे फॅन व्हाल. कोण आहे हा छोटा? हा दुसरा तिसरा कोणी नसून अमृताचा भाचा आहे. म्हणजेच आदिती खानविलकर या बहिणीचा मुलगा. अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर फारच सक्रिय (amruta khanvilkar social media) असते. सतत निरनिराळे फोटोज आणि व्हिडीओज ती शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या लहानग्या भाच्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अमृता नेहमीच असे व्हिडीओ शेअर करते. तर तिच्या कुटुंबीयासोबत असलेलं तिचं घट्ट नातं यातून दिसून येतं. या व्हिडीओत लहानगा निर्वाण आपल्या आईसोबत म्हणजेच आदिती खानविलकर सोबत खेळत आहे. तर त्याचे बोबडे बोल तो बोलत आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला असून अनेक कमेंट्स या व्हिडीओ ला मिळाल्या आहेत. अमृतानेच या VIDEO ला कॅप्शन काय द्याल असं विचारलं आहे. त्यावर स्पृहा जोशी, सोनाली खरे अशा अनेक सेलेब्रिटी मैत्रणींनी छान छान गोड ओळी सुचवल्या आहेत.

जाहिरात

काही सेलिब्रिटी तसेच अमृताचे मित्रमैत्रिणी यांनीही या पोस्ट वर कमेंट्स केल्या आहेत.

अमृताची जवळची मैत्रिण सोनाली खरे (Sonali Khare) हिनेही कमेटं करत कौतुक केलं आहे. याशिवाय स्पृहा जोशी, हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra), मंजिरी ओक यांनीही कमेंट्स केल्या आहेत. अमृताची बहीण आदिती ही चित्रपटसृष्टीत नाही. तर दुबईत तिच्या कुटुंबासोबत राहते. पण अमृता मात्र त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

‘मढ्यावरचं लोणी खाणारं हे…’, केदार शिंदेनी व्यक्त केला तीव्र संताप

अमृता काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘वेल डन’ (well done) या अमॅझॉन प्राइमवरील वेबसीरिज मध्ये दिसली होती. या खेरीज लवकरच ती शरद केळकर (Sharad Kelkar) सोबत एका नव्या चित्रपटात दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात