मुंबई, 04 मे : शार्क (Shark) कसा हल्ला करतात हे आपण फिल्ममध्ये पाहतच आलो आहोत. या शार्क फक्त माणसांवरच नाही तर एकमेकांवरही हल्ला (Shark Fighting) करतात. अशाच दोन शार्कचा व्हिडीओ (Shark Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात दोन्ही शार्क एकमेकांवर तुटून पडल्या आहेत. भर समुद्रात या शार्कमध्ये युद्ध रंगलं आहे. जशी माणसांमध्ये फायटिंग होते, अगदी तशीच प्राण्यांमध्येही होते. अगदी समुद्रातील मासेही एकमेकांशी लढतात. असेच दोन शार्क एकमेकांशी फायटिंग करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. त्या ा
व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला पाण्याच्या आत खूप मासे आहेत. या छोट्या छोट्या माशांमधून एक भलामोठा शार्क मासा येताना दिसतो. त्यानंतर आणखी एक शार्क मासा दिसतो. हे दोन्ही शार्क मासे आमनेसामने येतात आणि एकमेकांना भिडतात. त्यांची ही लढाई समुद्राच्या आतच नाही तर समुद्रावरही पाहायला मिळते. पाण्याच्या वर येऊन दोघंही एकमेकांना टक्कर देण्याचा प्रयत्न करतात. हे वाचा - अबबं! 100 वर्षांचा अवाढव्य मासा, वजन पाहून मच्छिमारही चक्रावला नवभारत टाइम्सने इंडिया टाइम्सच्या वृत्ताचा दिलेल्या हवाल्यानुसार हा व्हिडीओ 2019 मधील नॅशन जिओग्राफीकची डॉक्युमेंट्री कॅनिबल शार्कचा आहे. काही दिवसांपूर्वीच दोन शार्कचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण तो व्हिडीओ आताच्या व्हिडीओच्या अगदी उलट होता. यामध्ये दोन्ही शार्क एकमेकींसोबत अगदी आरामात सोबत राहत असल्याचं दिसलं.