'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री रुचिता जाधव अडकली लग्नबंधनात, कोविड इतमामात पाचगणीत पार पडला लग्नसोहळा...

'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री रुचिता जाधव अडकली लग्नबंधनात, कोविड इतमामात पाचगणीत पार पडला लग्नसोहळा...

‘लव्ह लग्नं लोचा’ (Love Lgn Locha) फेम अभिनेत्री रुचिता जाधवने (Ruchita Jadhav) आज आनंद मानेसोबत (Aanad Mane) लग्नगाठ बांधली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे- बॉलीवूड (Bollywood) असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी(Marathi Film Industry) सर्वच कलाकार करियरसोबत कौटुंबिक सुखाचा सुद्धा शोध घेत आहेत. आणि म्हणूच अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत (Star's Wedding) अडकत आहेत. मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर (Mitali mayekar-Siddharth Chandekar), आस्ताद काळे(Astad Kale),  संग्राम समेळ(Sangram Samel), ऋचा आपटे, क्षितीज दातेनंतर(Rucha Aapte-Kshitij Date) आत्ता आणखीन एक अभिनेत्री लग्नंबंधनात अडकली आहे. ‘लव्ह लग्न लोचा’ (Love Lgn Locha) फेम अभिनेत्री रुचिता जाधवने (Ruchita Jadhav) आज आनंद मानेसोबत (Aanad Mane) लग्नगाठ बांधली आहे.

बऱ्याच दिवसांपासून रुचिता जाधव आपल्या लग्नाला घेऊन चर्चेत होती. आज अखेर हा विवाह सोहळा पार पडला.सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. त्त्यामुळे सर्वच सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात तर कडक लॉकडाऊनचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यामुळे लग्नासारखे कार्यक्रम सरकारच्या नियमांनुसार करावे लागत आहेत. म्हणूनच रुचिताने सुद्धा हे सर्व नियम पाळत आपल्या कुटुंबाच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पाडला आहे.

पाचगणीच्या एका रिसोर्टवर हा लग्नसोहळा पार पडला. याची माहिती आधीच रुचिताने दिलेली होती. यावेळी मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. बऱ्याच दिवसांपासून रुचिता आपल्या लग्नाबद्दल चर्चेत होती. लग्नाला रुचिता आईचा शालू नेसणार असल्याच्या देखील चर्चा होत्या. त्यामुळे ती बरीच चर्चेत आली होती.

‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेमुळे रुचिता खुपचं प्रसिद्ध झाली होती. मात्र रुचिताने आपल्या कामाची सुरुवात जाहिरातीमधून केली होती. यातून तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला होता. रुचिता ही एक पुणेकर आहे. रुचिता सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. ती सतत आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

(हे वाचा: सहकुटुंब सहपरिवार : अंजी-पश्याचा रोमान्स VIDEO VIRAL; पश्याला केलं किस)

‘लव्ह लग्न लोचा’ ही मालिका झी युवावर प्रदर्शित होतं होती. ‘राघव, काव्या, सुमित, विनय, अभिमान, शाल्मली, सौम्या यांच्या धम्माल स्टोरीने तरुणाईला वेड लावलं होतं. या मालिकेत रुचिताने स्टाईलिश आणि बिनधास्त अशा ‘काव्या’चं पात्र साकारलं होतं. काव्या आणि राघवची केमिस्ट्री चाहत्यांना खुपचं आवडली होती.

Published by: Aiman Desai
First published: May 4, 2021, 8:07 PM IST

ताज्या बातम्या