Home /News /lifestyle /

आई थोर तुझे उपकार! मुलांसाठी काढून दिला आपल्या काळजाचा तुकडा

आई थोर तुझे उपकार! मुलांसाठी काढून दिला आपल्या काळजाचा तुकडा

दोन मातांनी आपल्या मुलांना आपलं यकृत दान केलं.

    मुंबई, 13 जून : आपल्या अपत्याच्या मार्गात कोणतंही संकट आलं तरी आई त्या संकटाशी दोन हात करते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. महाराष्ट्रातील दोन मातांनी आपलं यकृतदान (Liver donation) करून आपल्या काळजाच्या तुकड्याला जीवनदान दिलं आहे. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात या दोघांवरही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. जळगावमधील सहा वर्षांचा आराध्य सरोदे आणि हिंगोलीतील 9 वर्षांची मयुरी ढेंबरे (9) या दोघांनाही यकृताचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. जन्मतः या दोघांनाही यकृताची समस्या होती.  मात्र वेळेत निदान न झाल्याने आजार वाढला आणि यकृताचा कर्करोग झाला. वैद्यकीय भाषेत याला हेपाटोब्लास्टोमा (बालपणातील एक अत्यंत दुर्मिळ यकृत कर्करोग) असे म्हणतात. या आजारामुळे दोन्ही मुलांचे यकृत निकामी झाले होते. या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. मात्र, दोघांसाठी त्यांची आई पुढे आली. या मातांनी यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र देशभरात लॉकडाऊन असल्याने शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या. हे वाचा - अरे बाप रे! कोरोना लॉकडाऊन पडला भारी, इतका लठ्ठ झाला की हलताडुलताही येईना ग्लोबल रुग्णालयातील बालरोग हिपॅटालॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर म्हणाले की, "या रूग्णांना 10 वेळा केमोथेरपी देणे गरजेचं असतं. मात्र बऱ्याचदा सातव्या किंवा आठव्या केमोथेरपीच्या सायकलनंतर रुग्णांची स्थिती पाहून यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतं. या दोघांच्या बाबतीत लॉकडाऊन असल्याने मार्चमधील शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली होती. त्यामुळे किमोथेरपी सुरू ठेवण्यात आली होती" हे वाचा - कोरोनामुक्त व्यक्तींचं रक्तच CORONAVIRUS पासून संरक्षण देणार? ग्लोबल रूग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) डॉ. विवेक तलैळीकर म्हणाले की, "देशभरातील लॉकडाऊनमुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र रुग्णाची प्रकृती पाहून पहिल्यांदा जीव वाचवणे गरजेचं आहे. या अनुषंगाने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमुळे दोन्ही मुलांना नव्याने जीवनदान मिळाले आहे.’’ हे वाचा - पार्कात आलं भूत आणि करू लागलं जिम? फिटनेस फ्रिक भुताचा VIDEO VIRAL परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. रवी मोहंका आणि डॉ. अनुराग श्रीमल यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया झाली. डॉ. रवी मोहंका म्हणाले की, ‘‘शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या दोन्ही मुलांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. हा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. दोन्ही मुलांच्या आईने यकृतदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानं शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र मयुरीची आई आशा ढेंबरे  यांचा रक्तगट जुळत नसल्याने त्यांना एक विशिष्ट इंजेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर 1 मे रोजी तिच्यावर यकृत प्रत्यारोपण पार पडले. याशिवाय 20 मे रोजी आराध्याच्या आईने यकृताचा भाग दान केल्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली" हे वाचा - महिला की पुरुष; CORONA सर्वात जास्त कुणाला बनवतोय आपला शिकार लहान मुलांवर यकृत प्रत्यारोपण करणारे सर्जन डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले की, "लहान मुलांवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हे अवघड आणि गुतांगुतीचे काम आहे. मात्र डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे. या रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. आता दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे" संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या