Home /News /lifestyle /

अरे बाप रे! कोरोना लॉकडाऊन पडला भारी, इतका लठ्ठ झाला की हलताडुलताही येईना

अरे बाप रे! कोरोना लॉकडाऊन पडला भारी, इतका लठ्ठ झाला की हलताडुलताही येईना

कोरोना लॉकडाऊनमुळे घरात राहिल्याने तब्बल 100 किलो वजन वाढलं (weight gain) आहे.

    वुहान, 13 जून : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन (lockdown) लागू केला. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाव्हायरसचा सर्वात आधी उद्रेक झाला, तिथं जानेवारीत लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनचा फटका एका व्यक्तीला बसला. या व्यक्तीचं वजन तब्बल 100 किलो (weight gain) वाढलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार झोउ असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं वय 26 आहे. तो एका इंटरनेट कॅफेत काम करत होता. मात्र लॉकडाऊनमुळे 5 महिने त्याला घरातच राहावं लागलं. डिसेंबर 2019 अखेर झोउचं वजन 177 किलो होतं. जानेवारीत वुहानमध्ये कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि आता त्याचं वजन तब्बल 280 किलो झालं. शहरात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयातील गर्दी यामुळे त्याने उपचार घेण्यासही उशीर केला. त्याच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार अचानक वजन वाढल्याने त्यांना घरातल्या घरातही चालता फिरताही येईना. हे वाचा - कोरोनामुक्त व्यक्तींचं रक्तच CORONAVIRUS पासून संरक्षण देणार? वाढलेल्या वजनामुळे त्याला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  झोउ आता वुहान शहरातील सर्वाधिक वजन असलेली व्यक्ती आहे, असं सांगितलं जातं. चीनमध्ये पुन्हा आला कोरोना, बीजिंगमधील अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन चीनच्या वुहानमधून पसरलेला कोरोना व्हायरस कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा वेगानं बीजिंगमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बीजिंगमधील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. बीजिंग इथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून चीनमध्ये 10 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. हे वाचा -  कोरोना संसर्गामुळे मृत्यू ओढावलेल्या व्यक्तीबाबत सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय बीजिंग इथे 56 दिवसांनंतर पुन्हा एकदा गुरुवारी 11 जूनला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.त्यानंतर पुन्हा शुक्रवारी 2 रुग्ण आढळले असल्यानं तातडीनं बीजिंगमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परदेशात अडकलेल्या लोकांना घेऊन जाणारी कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाणे किंवा विमान बीजिंगमध्ये दाखल झाले नाहीत. याशिवाय बीजिंगमधील सर्व उड्डाणं इतर शहरांकडे वळवण्यात आली आहेत. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी, गुजरातही देशात दुसऱ्या क्रमांकावर!
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या