जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पार्कात आलं भूत आणि करू लागलं जिम? फिटनेस फ्रिक भुताचा VIDEO VIRAL

पार्कात आलं भूत आणि करू लागलं जिम? फिटनेस फ्रिक भुताचा VIDEO VIRAL

पार्कात आलं भूत आणि करू लागलं जिम? फिटनेस फ्रिक भुताचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर Fitness freak ghost चा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिक भयभीत झालेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 13 जून : संपूर्ण देश डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा कोरोनाव्हायरसशी मुकाबला करत आहेत. अशात भूत व्यायाम (ghost excercise) करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फिटनेस फ्रीक भूत (Fitness freak ghost) म्हणून हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आणि सर्वांनाच घाम फुटला. इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. झाशीच्या (Jhansi) काशीराम पार्कमधील ही दृश्यं आहेत. ओपन जिममधील ही मशीन आपोआप हलते आहे. अशी आपोआप हलणारी मशीन पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्यच वाटेल. खरंच या मशीनवर कुणी भूत एक्सरसाईज करत आहे हा अशा प्रश्न तुमच्याही मनात येईल.

जाहिरात

या घटनेची पडताळणी करण्यासाठी न्यूज 18 ची टीम घटनास्थळी पोहोचली. हा व्हिडीओ काशीराम पार्कमधीलच असल्याचं स्पष्ट झालं. मात्र कोणताही भूत त्यावर व्यायाम करत नाही आहे. तशी अफवा पसरवली जात असल्याचंही समोर आलं आहे.  जेव्हा दोन ते तीन वेळा हे मशीन हलवलं त्यानंतर ते कित्येक तरी वेळ तसंच हलत होतं. हे वाचा -  हात न लावताच वाजणारी घंटा! कोरोना काळातही मंदिरात घुमणार घंटानाद कुणीतरी मुद्दाम भूत एक्सरसाइज करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीसिंगमुळे हे मशीन आपोआप हलत आहे. पार्कातील सुरक्षारक्षकदेखील गेल्या 8 वर्षांपासून इथं नोकरी करत आहे, मात्र त्यालादेखील असं काही कधीच दिसून आलं नाही. ही अफवा पसरवली जात असल्याचं त्यानं सांगतिलं. हे मुद्दाम कुणीतरी करत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे आणि त्या व्यक्तीचा तपास सुरू असून, त्याच्या कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. संपादन - प्रिया लाड हे वाचा -  मुंबईत पोलिसाचा हायहोल्टेज ड्रामा, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चढला, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात