Home /News /lifestyle /

कोरोनामुक्त व्यक्तींचं रक्तच CORONAVIRUS पासून संरक्षण देणार?

कोरोनामुक्त व्यक्तींचं रक्तच CORONAVIRUS पासून संरक्षण देणार?

सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर कोरोनामुक्त व्यक्तींच्या शरीरातील प्लाझ्मा (blood plasma) देऊन उपचार शक्य आहे का? याबाबत ट्रायल सुरू आहे.

    अ‍ॅनापोलिस, 13 जून : कोरोनामुक्त व्यक्तीचं रक्त कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचवण्यासाठी मदत करेल या आशेने प्लाझ्मा थेरेपीचे (plasma therapy) प्रयोग सुरू आहेत. याासाठी कोरोनावर मात केलेले रुग्ण रक्तदान करत आहेत. आता त्यांचं हेच रक्त कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकतं का? याबाबत संशोधन केलं जाणार आहे. एपी न्यूजच्या रिपोर्टनुसार जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींचे प्लाझ्मा इतरांना कोरोनाव्हायरसपासून संरक्षण देऊ शकतात का? यावर रिसर्च करणार आहेत. 150 व्यक्तींवर हा प्रयोग केला जाणार आहे. त्यांना एकतर कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीचे प्लाझ्मा दिले जातील. ज्यामध्ये कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीज तयार झालेल्या असतील किंवा आधीपासून साठवून ठेवलेले सामान्य प्लाझ्मा दिले जातील. त्यानंतर शास्त्रज्ञ यातील फरक तपासतील, हे प्लाझ्मा दिल्यानंतर कोरोनाव्हायरसपासून किती संरक्षण मिळतं हे पाहतील. हे वाचा - महिला की पुरुष; CORONA सर्वात जास्त कुणाला बनवतोय आपला शिकार कोरोनाव्हायरसवर सध्या कोणतीही प्रभावी लस अद्याप आलेली नाही. विकसित करण्यात आलेल्या काही लसींचे प्रयोग सुरू आहेत. तर व्हायरसविरोधात औषधही उपलब्ध नाही. इतर आजारांवर उपलब्ध असलेल्या औषधांच्या चाचण्या कोरोनाग्रस्तांवर केल्या जात आहे. त्यातील काही औषधांचे चाचण्या यशस्वी ठरत असल्याचं दिसत आहे. तर काही कोरोना रुग्णांना कोरोनामुक्त व्यक्तीचं रक्त देऊन उपचार करता येतील का, याबाबतही ट्रायल सुरू आहे. त्यापैकी काही ट्रायल यशस्वी तर काही अयशस्वी होताना दिसत आहेत. हे वाचा - हात न लावताच वाजणारी घंटा! कोरोना काळातही मंदिरात घुमणार घंटानाद शास्त्रज्ञांच्या मते, जर हा प्रयोग यशस्वी झाला तर जोपर्यंत कोरोनाव्हायरसची लस येत नाही तोपर्यंत कोरोनामुक्त व्यक्तीचे प्लाझ्मा खूप महत्त्वाचे ठरतील. ज्यांना कोरोनाव्हायरसचा जास्त धोका आहे, अशा व्यक्तींची कोरोनाव्हायरसविरोधी रोगप्रतिकारक शक्ती तात्पुरती वाढवणं शक्य होईल. "आम्हाला या प्रयोगातून खूप आशा आहे", असं जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ. शेम्युल शोहम म्हणालेत. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - कोरोना लक्षणासंदर्भात आरोग्य मंत्रालयाचा सल्ला, हा त्रास झाला तर लगेच करा टेस्ट
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या