मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /या वाईट सवयी लगेच सोडा; हाडं होतील कमजोर आणि मोडतीलही लवकर

या वाईट सवयी लगेच सोडा; हाडं होतील कमजोर आणि मोडतीलही लवकर

रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे आपले मसल्स कमजोर व्हायला लागतात. त्यामुळे मसल्स चांगले ठेवायचे असतील तर योग्य वेळी आणि चांगला आहार घेणं महत्त्वाचं असतं.

रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे आपले मसल्स कमजोर व्हायला लागतात. त्यामुळे मसल्स चांगले ठेवायचे असतील तर योग्य वेळी आणि चांगला आहार घेणं महत्त्वाचं असतं.

हाडं कमजोर (Bone weakens) झालीत हे लगेच लक्षात येत नाही. पण, त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो असतो. हाडं मजबूत(Strong bones) राहण्यासाठी आपल्या वाईट सवयी सोडून द्या.

दिल्ली 8 जून : निरोगी शरीरासाठी हाडंही मजबूत (Strong bones) असावी लागतात. हाडं कमजोर (Bone weakens) झाल्यामुळे अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. रोजच्या हालचाली करण्यात अडचणी यायला लागतात. संधिवातासारखा (Arthritis) त्रास वाढत्या वयानुसार किंवा अनुवांशिकतेने होऊ शकतो.  आजकाल बदललेल्या लाइफस्टाईलमुळे,धावपळीच्या आयुष्यामुळे,आपला आहार आणि तब्येतीकडे लक्ष नसल्यामुळे हाडांचा त्रास होतो. आजकाल सगळ्यांचं आयुष्य धावपळीचं बांनलेलं आहे. त्यामुळे लोकं वेळेवर आणि व्यवस्थित जेवण करत नाही. त्याने शरीराला पोषण (Nutrition to the Body)मिळत नाही आणि आपली हाडं कमकूवत होतात. हाडं कमजोर झाल्यामुळे फ्रॅक्चर (Fracture) होण्याची भीती देखील वाढलेली आहे. हाडांच्या कमजोरीने थोडसं पडल्यानंतर किंवा लागल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची भीती देखील वाढलेली आहे. त्यामुळेच आपल्या आयुष्यातल्या काही वाईट सवयी (Bad Habits) काढून टाकल्या तर, उतारवयामुळे हाडं कमजोर झाल्यामुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊयात या सवयी.

धूम्रपान

जे लोक तंबाखू खातात त्यांची बोन डेन्सिटी कमी (Low Bone Density) होऊन जाते. ज्यामुळे हाडांचे आजार व्हायला सुरुवात होते. स्मोकिंगमुळे फ्री रॅडिकल्स वाढतात. त्याने हाडांना कमजोर करणारे हार्मोन्स रिलीज व्हायला सुरुवात होते.

(औषध म्हणून Steroid घेत आहात? या चुका टाळा; अचानक वाढेल वजन)

हालचालींचा अभाव

जे लोक दिवसभर केवळ बसून राहतात कोणतीही हालचाल करत नाहीत. त्यांना हाडांचे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. खरंतर आपले स्नायू आणि हाडं मजबूत राहण्यासाठी वर्कआऊट करणं गरजेचे आहे. त्यामुळे घरातच राहणाऱ्या लोकांनी सकाळी किंवा संध्याकाळी चालणं, वॉकिंग, व्यायाम, योगा करावा. त्यामुळे हाडं मजबूत राहतील.

मिठाचं जास्त प्रमाण

जेवणात मिठाचं प्रमाण जास्त असेल, दिवसभरामध्ये जास्त मीठ खात असाल तर, त्याने देखील हाडांना धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांच्यामते मिठामध्ये सोडियम असतं. जास्त प्रमाणामध्ये सोडियम शरीरात गेल्यामुळे बॉंन डेन्सिटी कमी होऊ लागते. आपल्या आहारामध्ये दिवसभरात केवळ 150 मिलीग्रॅम मीठ असायला हवं.

(चांगल्या कामासाठी जाताना खा दही-साखर? हे आहे त्यामागचं शास्त्रीय कारण)

उन्हात जाण्यास टाळाटाळ

दिवसभर घरामध्ये राहिल्यामुळे हाडांची मजबुती कमी होते. उन्हात गेल्याने व्हिटॅमीन डी मिळतं. विटामिन डीमुळे शरीरामध्ये कॅल्शियमचं शोषण वाढतं. त्यामुळे सकाळच्यावेळी घरांमधून बाहेर पडा. सकाळच्या कोवळ्या ऊन्हाने शरीराला व्हिटॅमीन डी मिळेल. याशिवाय विटामिन डीच्या सप्लिमेंट देखील घेऊ शकता.

(‘लढणं थांबवता येत नाही’; वडिलांच्या निधनानंतरही अभिनेत्री करतेय शेतात काम)

हाडांसाठी कॅल्शियम

कॅल्शियमने  हाडं मजबूत राहतात. उलट कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाड पातळ होऊन, कमजोर व्हायला लागतात. दूध,दही या सारख्या पदार्थांनी कॅल्शियम मिळतं त्यामुळे हे पदार्य़ आवडत नसतील तरी खा. त्याबरोबर कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी सप्लिमेंट घ्या.

First published:

Tags: Healthy bones, Lifestyle