नवी दिल्ली 16 जुलै : आपल्या मनाची तार जुळेल असा जोडीदार (Soulmate) शोधणं हे सोपं काम नाही. त्यातही मुस्लिमांच्या बाबतीत ते अनेक कारणांनी अवघड बनतं. सामाजिक अंतर, विविध प्रकारची संस्कृती आदी विविध कारणांमुळे एखाद्या नव्या व्यक्तीशी रिलेशनशिप तयार करणं कठीण होतं. आता मात्र पूर्वी कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी कनेक्ट होण्यात तंत्रज्ञान मदत करतंय.
स्वप्नातला राजकुमार/राजकुमारी शोधण्यासाठी मुस्लिम डेटिंग अॅप्स (Muslim Dating Apps) हे लोकप्रिय माध्यम म्हणून पुढे येत आहे. ई-हार्मनी (eHarmony), मुस्लिमा (Muslima), मुस्लिम फ्रेंड्स (Muslimfriends), इलाइट सिंगल्स (Elitesingles), मझमॅच (Muzmatch), इश्क (Eshq), सलाम्स (Salams), सिंगल मुस्लिम (Singlemuslim), किरान (Qiran), सलाम लव्ह (Salaamlove) आणि मुस्लिम मॅट्रिमोनी (Muslim matrimony) ही टॉप 11 मुस्लिम डेटिंग अॅप्स आहेत.
या प्रत्येक मुस्लिम डेटिंग अॅपचे रिव्ह्यूज आम्ही तपासले आहेत. या प्रत्येक अॅपची सर्वसाधारण वैशिष्ट्यं खाली दिली आहेत.
ई-हार्मनी : अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, ब्रिटन या देशांतल्या सिंगल मुस्लीम प्रोफेशनल्समध्ये हे अॅप वापरलं जातं. तज्ज्ञ मॅचमेकर्स युझर्सचे प्रेफरन्सेस पाहून फेस-टू-फेस डेट्स निश्चित करून देतात.
मुस्लिमा : या अॅपमध्ये निःशुल्क आणि सशुल्क अशा दोन्ही प्रकारचे प्लॅन्स असतात. युझर्सचं व्हेरिफिकेशन (User Verification) करण्याचं या अॅपचं धोरण कडक आहे. युझर्सनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे या अॅपचे अल्गोरिदम्स जगभरातल्या युझर्सशी त्यांना कनेक्ट करतात. या अॅपवर नोंदणी केलेल्यापैकी बहुतांश जण अल्जीरिया, फ्रान्स, ब्रिटन आणि सौदी अरेबिया या देशांतले आहेत.
ब्रेकअप झालेल्या मजनूनं लोकांच्या गाड्यांवर काढला राग; कारण ऐकून पोलिसही हैराण
मुस्लिम फ्रेंड्स : ही अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतली कंपनी असून, तिला अलीकडेच 20 वर्षं पूर्ण झाली आहेत. मध्य पूर्वेतले देश, आफ्रिका, आशिया, युरोप, कॅनडा आणि अमेरिका या प्रदेशात या अॅपचे बहुतांश युझर्स आहेत. अन्य स्पर्धक अॅप्सच्या तुलनेत या अॅपचे प्लॅन्स स्वस्त आहेत.
इलाइट सिंगल्स : ही ऑनलाइन डेटिंग सर्व्हिस (Online Dating Service) एकट्या अमेरिकेतच 50 लाखांहून अधिक जण वापरतात. याचे फ्री आणि प्रीमिअम असे दोन्ही प्रकारचे प्लॅन्स आहेत. युझरच्या व्यक्तिमत्त्वाचं मूल्यमापन त्याच्या कल्पना, उद्दिष्टं यांच्या आधारे केलं जातं. त्यासाठी युझरला नोंदणी करून एक टेस्ट देऊन मॅच मेकिंग सुरू करावं लागतं. या अॅपच्या युझर्समध्ये 30 वर्षांखालच्या स्त्री-पुरुषांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
मझमॅच : या अॅपचे 40 लाखांहून अधिक नोंदणीकृत युझर्स असून, ते 190 देशांत पसरलेले आहेत. यामध्ये चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल मोफत करता येतात. तसंच, यात युझर्सना त्यांच्या निकषांनुसार मुस्लिमांचा शोध घेता येतो. त्यांच्या जवळपासच्या प्रदेशात, शहरात राहणारे, त्यांची धार्मिकता किती आहे, ते प्रार्थना किती वेळ करतात आदी निकषांच्या आधारे मुस्लिम जोडीदार शोधता येतो. भाषा, प्रोफेशन आदी अनेक निकषांच्या आधारेही जोडीदार शोधणं या अॅपद्वारे शक्य आहे.
इश्क : सध्या तरी हे मॉडर्न मुस्लिम डेटिंग अॅप केवळ आयफोन युझर्ससाठीच खास डिझाइन करण्यात आलं आहे. लवकरच ते अँड्रॉइड युझर्ससाठी उपलब्ध होणार असल्याचं कंपनीच्या वेबसाइटवर म्हटलं आहे. इश्क हे अॅप महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. मुस्लिम महिलांचं सबलीकरण करत असल्याचा दावा हे अॅप करतं. विवाह, डेटिंग की रिलेशनशिप यांमधून युझर्स त्यांचे प्राधान्यक्रम निवडू शकतात.
सेम टू सेम! वडिलांसारखीच बॉलिंग करतो मुरलीधरनचा मुलगा, Video Viral
सलाम्स : हे अॅप पूर्वी माइंडर (Minder) या नावाने ओळखलं जात असे. हलाल, सिम्पल, सेफ आणि सेक्युअर डेटिंग सेवा पुरवत असल्याचा दावा सलाम्सतर्फे केला जातो. युझरचं शिक्षण, क्षेत्र, करिअर, उंची, आध्यात्मिक पातळी आदी विविध निकषांच्या आधारे अॅप प्रोफाइल्स फिल्टर करता येतात. Tinder या प्रसिद्ध डेटिंग अॅपवरून या अॅपचं नाव Minder असं ठेवण्यात आल्यामुळे ते बरंच चर्चेत आलं होतं. त्यामुळे याचं नाव बदलून सलाम्स असं ठेवण्यात आलं.
सिंगल मुस्लिम : या अॅपचे 25 लाख युझर्स आहेत. युझर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी हे अॅप फोटोग्राफ्सना रिस्ट्रिक्टेड अॅक्सेस देतं. प्रोफेशन, वय, शारीरिक ठेवण, धर्म यांच्या आधारे जोडीदार शोधण्याची संधी देणारी सिंगल मुस्लिम ही एक महत्त्वाची मुस्लिम डेटिंग वेबसाइट आहे.
किरान : या अॅपचे 20 लाखांहून अधिक सिंगल मुस्लिम युझर्स आहेत. मुस्लिम मॅनेजमेंटकडून चालवलं जाणारं हे एकमेव मुस्लिम डेटिंग अॅप आहे. स्ट्रेट सेक्शुअल ओरिएंटेशन असलेल्या युझर्सनाच यावर नोंदणी करता येते. हे अॅप धार्मिक डेटिंग कॅटेगरीमध्ये मोडतं. स्टँडर्ड आणि प्रीमिअम मेंबरशिप फीचे पर्याय या अॅपमध्ये आहेत.
सलाम लव्ह : या अॅपद्वारे स्वतःचा जोडीदार शोधण्यासाठी युझर्सना एक छोटी प्रश्नावली भरून द्यावी लागते. हे अरब आणि आशियाई मुस्लिम सिंगल्सचं नेटवर्क (Muslim Singles) आहे. शिया आणि सुन्नी पंथातल्या सिंगल्सना यावर नोंदणी करता येते. या अॅपला मॅचमेकिंगमधला 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. युझर्सना एकमेकांशी ओळख करून घेण्यासाठी चॅटरूम्स, ब्लॉग्ज, फोरम्सची सुविधा उपलब्ध आहे.
मुस्लिम मॅट्रिमोनी : ही भारतीय डेटिंग सुविधा आहे. प्रायव्हसी जपण्यासाठी फोटो, फोन नंबर आणि जन्मपत्रिका कोणाला दिसेल, हे युझर्सना ठरवता येतं. प्रोफाइल तयार करून जोडीदार शोधता येतो. प्रथमदर्शनी आवडेल त्या युझरशी संपर्क साधता येतो.
युझर्सचे अनुभव
Coronavirus: गर्दी थांबवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच व्यापक धोरणाची गरज - CM
नवी दिल्लीतल्या शाहीनबागमधल्या मझमॅच अॅपच्या युझरने न्यूज 18च्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, 'डेटिंग अॅपवर आपण असल्याचं समर्थन करणं मुस्लिमांकरिता कठीण असतं. त्यामुळे मझमॅचवर मी जॉइन झालो, तेव्हा डेटिंगपेक्षाही माझा आयुष्यभरासाठीचा जोडीदार निवडणं हेदेखील माझं उद्दिष्ट होतं. फिल्टर्स आणि सर्चेसचा वापर करून मी भारत आणि भारताबाहेरच्या अनेक व्यक्तींशी मॅच करून पाहिलं.'
'बहुतांश संवाद गंभीर स्वरूपाचे होते. तरीही त्यात काही चुकल्यासारखं वाटत होतं. कोरोनामुळे कोणाला प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं. युरोप, तसंच आफ्रिकेतल्या मुस्लिमांशी चांगला संवाद झाला. आपापल्या भागात आपल्या धर्माशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. सरतेशेवटी माझा विवाह पारंपरिक पद्धतीने म्हणजे आई-वडिलांकडून जुळवला गेला; मात्र डेटिंग अॅपवरचा एकंदर अनुभव चांगला होता. मी माझ्या जोडीदाराकडून नेमकी कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतो, यावर विचार करण्याचा पर्स्पेक्टिव्ह यातून मिळाला,' असं त्या युझरने सांगितलं.
महिला सबलीकरण (Empowering Girls)
न्यूज 18ने मुंबईतल्या एका महिला युझरशी संवाद साधला, तेव्हा ती तिचा अनुभव शेअर करण्यास तयार नव्हती. तिचं नाव प्रसिद्ध केलं जाणार नसल्याचं सांगितल्यानंतरच तिने आपले अनुभव सांगितले.
'आई-वडील माझं लग्न एका नातेवाईकाशी लावणार होते. ते मला मान्य नव्हतं. मी कॉलेजमधल्या मित्रमंडळींमध्ये हा विषय मांडला, तेव्हा त्यांनी मुस्लिम डेटिंग अॅप्सचा सल्ला दिला. मी त्यासाठी गुगल सर्च केलं. तेव्हा अनेक अॅप्स सापडली. इश्क, मुस्लिम मॅट्रिमोनी, सलाम्स या अॅप्सवर मी नोंदणी केली. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतल्या युझर्सशी संपर्क साधला. गेल्या नोव्हेंबरमध्ये मला डॉक्टर असलेला जोडीदार सापडला.माझ्या कुटुंबीयांनीही त्याला स्वीकारलं. जानेवारीत आम्ही विवाहही केला. मुस्लिम मुलींना स्वतःच्या आवडीनुसार जोडीदार निवडण्याची संधी मुस्लिम डेटिंग अॅप्सनी दिली आहे. पूर्वी यासाठी मुलींना सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागत होता,' असं तिने सांगितलं.
विद्यार्थ्यांनो! निकालासंदर्भातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा या बातमीवर
प्रायव्हसीसाठी (Privacy) काय काळजी घ्यायची?
ई-स्विफ्ट सॉफ्टवेअर या हैदराबादमधल्या आयटी कंपनीचे डायरेक्टर सईद एम. ए. यांनी सांगितलं, की मुस्लिम डेटिंग अॅप्सचा मॅट्रिमोनियल वेबसाइट्स म्हणून उदय होत आहे. बहुतेकशा अॅप्समध्ये युझर व्हेरिफिकेशन सिस्टीम (User Verification System) चांगली नाही. मुस्लिम डेटिंग अॅप्सवर कोणीही फेक ई-मेल आयडी, फेक फेसबुक आयडी वापरून अकाउंट तयार करू शकतं. त्यांच्याद्वारे या अॅप्सचा दुरुपयोग केला जाऊ शकतो.
'इश्क अॅपमध्ये स्ट्राँग व्हेरिफिकेशन सिस्टीम आहे. फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन प्रोफाइलच्या लिंक्सही युझर्सकडून मागितल्या जातात. यापैकी एक लिंकही नसेल, तरीही युझर्स यावर नोंदणी करू शकत नाहीत,' असं ते म्हणाले.
'naukri.comला युझर बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन टीम आहे. म्हणजे युझर्सची पार्श्वभूमी त्यांच्याकडून तपासली जाते. त्यात काही चुकीची माहिती दिल्याचं आढळल्यास अकाउंट ब्लॉक केलं जातं. त्याप्रमाणेच मुस्लिम डेटिंग अॅप्सबाबतही करणं आवश्यक आहे,' असं त्यांनी सुचवलं.
इस्लाममध्ये (Islam) डेटिंगला परवानगी आहे का?
इस्लाम धर्मामध्ये डेटिंगला (Dating) परवानगी आहे का, मुस्लिम डेटिंग अॅप्सची गरज आहे का, असा प्रश्न अनेक मुस्लिम विचारतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न न्यूज 18ने केला.
लखनौतल्या इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे सुन्नी पंथाचे धर्मगुरू मौलाना सुफियान यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी सांगितलं, 'आपला संभाव्य जोडीदार आणि त्याच्या कुटुंबाला बुरखा (Hijab) घालून भेटता येतं. मुस्लिम वर आणि वधू यांनी आपापल्या चांगल्या-वाईट कृत्यांची माहिती परस्परांना दिली पाहिजे.'
एका प्रश्नाला उत्तर देताना मौलाना सुफियान म्हणाले, 'मुस्लिम युझर्सनी डेटिंग अॅप्सवर आणि सोशल मीडिया अॅप्सवर फोटो अपलोड करू नयेत. मुस्लिम महिलांच्या फोटोजचा लिलाव झाल्याच्या वृत्ताचा हवाला त्यांनी दिला. मुस्लिम तरुणांनी डेटिंग अॅपवरून एखाद्या व्यक्तीला भेटण्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. लग्नाआधी दोघांच्या कुटुंबीयांनीही एकमेकांना भेटलं पाहिजे.'
'भावी वर-वधूंनी एकमेकांना लग्नाआधी भेटण्याला इस्लाममध्ये परवानगी आहे; मात्र प्रत्येकाने बुरखा घातला पाहिजे,' असंही मौलाना सुफियान यांनी स्पष्ट केलं.
मिर्झा घनी बेग - न्यूज 18
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dating app, Muslim, Online dating