• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ब्रेकअप झालेल्या मजनूनं लोकांच्या गाड्यांवर काढला राग; विचित्र कारण ऐकून पोलिसही हैराण

ब्रेकअप झालेल्या मजनूनं लोकांच्या गाड्यांवर काढला राग; विचित्र कारण ऐकून पोलिसही हैराण

ब्रेकअप झाल्यानं हृदय तुटलेल्या एका तरुणानं (Heart Broken lover) अनेक गाड्यांची तोडफोड केली. गुरुवारी रात्री या युवकानं केलेल्या गाड्यांच्या नुकसानानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली.

 • Share this:
  बंगळुरू 16 जुलै: ब्रेकअप (Breakup) झाल्यानं हृदय तुटलेल्या एका तरुणानं (Heart Broken lover) अनेक गाड्यांची तोडफोड (Man Damaged Cars) केली. ही घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमधील (Bangalore) आहे. गुरुवारी रात्री या युवकानं केलेल्या गाड्यांच्या नुकसानानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या तरुणाला अटक करण्यात आली. यानंतर त्यानं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. गुटखा पुडी न दिल्यानं तरुणाची सटकली; तलवारीनं मित्रावरच केला जीवघेणा हल्ला तरुणानं सांगितलं, की त्याचा ब्रेकअप झाला आहे. यानंतर त्याचं मन तुटलं असून तो सदम्यात होता. याच कारणामुळे त्यानं गाड्यांची तोडफोड केली. आरोपीनं आपला गुन्हा मान्य केला आहे. सध्या बंगळुरू पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याआधी याच वर्षातील मार्च महिन्यात दक्षिण बंगळुरुच्या चेन्नमनाकेरे अचुकट्टूमध्ये सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नशेत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांमध्ये आणि एका 20 वर्षीय विद्यार्थ्यामध्ये भांडण सुरू झालं. या घटनेतही आरोपींनी घराबाहेर उभा असलेल्या चारचाकी आणि दुचाकींसह जवळपास 15 वाहनांचं नुकसान केलं. तोडफोड केल्याचा आवाज ऐकून लोक आपल्या घरांबाहेर आले होते. पुणे: FBवरून मैत्री करत युवकाचा विवाहितेवर बलात्कार, स्टेटसला ठेवले अश्लील VIDEO दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी या सर्व आरोपींची ओळख पटवली होती. यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली होती. अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. तर, एका आरोपीला तुरुंगात टाकत त्याची कसून चौकशी करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी सांगितलं, की तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी सर्वांनी आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. दारूच्या नशेत असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. मात्र, गाड्यांची तोडफोड केल्याची घटना आठवत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. मात्र, जेव्हा सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आलं तेव्हा त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं.
  Published by:Kiran Pharate
  First published: