Home /News /lifestyle /

आश्चर्यकारक! जगभरातील 40 हून जास्त देशांमध्ये साजरा करत नाहीत 'ख्रिसमस'

आश्चर्यकारक! जगभरातील 40 हून जास्त देशांमध्ये साजरा करत नाहीत 'ख्रिसमस'

यंदा सर्वच सणांवर कोरोनाचं (Coronavirus) सावट असल्याने ख्रिसमसही कमी थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे. दरम्यान काही देश असेही आहेत की ज्याठिकाणी ख्रिसमस साजराच केला जात नाही

  मुंबई, 25 डिसेंबर: जगभरात नाताळचा म्हणजेच ख्रिसमसचा (Christmas) सण दरवर्षी 25 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा होत आहे. पाश्चात्य देशांमध्ये तर या काळात मोठी धामधूम असते. सर्वत्र रोषणाई, जल्लोष असतो. भारतातही (India) थाटामाटात हा सण साजरा होते. यंदा मात्र कोव्हिड 19 (Covid 19) च्या महाभयंकर साथीमुळं आणि नुकत्याच ब्रिटनमध्ये (UK) आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूमुळं दुसऱ्या लाटेचा धोका वाढल्यानं ख्रिसमस (Christmas) साजरा न करण्याचं आवाहन अनेक देशांनी केलं आहे. मात्र जगातील 200 पैकी 40 पेक्षा जास्त देश असे आहेत, जिथं ख्रिसमसची परंपरा नाही. तर काही देशांमध्ये ख्रिसमस साजरा करणं गुन्हा ठरतो आणि त्यासाठी कठोर शिक्षाही केली जाते. 2010च्या जणगणनेनुसार, जगात सर्वात जास्त लोक ख्रिश्चन धर्माचे असून, जगाच्या लोकसंख्येच्या 31 टक्के लोकसंख्या म्हणजे 7 अब्जांपैकी 2.2 अब्ज लोक ख्रिश्चन आहेत. तर 70 टक्के लोक असे आहेत जे धर्मानं ख्रिश्चन नाहीत, पण एक सण म्हणून ते ख्रिसमस साजरा करतात. जगातील 43 गैर ख्रिश्चन देशांमध्ये 25 डिसेंबर हा काही खास दिवस नसतो. तसंच तिथं त्यादिवशी सार्वजनिक सुट्टीही नसते. अर्थात काही प्रमाणात तिथं सेलिब्रेशन होतं. पण त्याला धार्मिक स्वरूप कमी आनंद साजरा करण्याचं निमित्त असं स्वरूप जास्त आहे. (हे वाचा-Covid काळात हा HR मॅनेजर ठरला गरिबांसाठी सुपर हिरो! Rice ATM ने शेकडोंना आधार) या 43 पैकी 18 देशात मात्र ख्रिसमस साजरा करण्यावर पूर्णतः बंदी आहे. यामध्ये चीनसह मुस्लीम बहुल देशांचा आणि बौद्ध धर्मीय देशांचा समावेश आहे. या मुस्लीम देशांमध्ये ख्रिसमस साजरा होत नाही यात आघाडीचा देश आहे अफगाणिस्तान. इथं 1990 पासून तालिबानची समांतर हुकुमशाही असल्यानं आणि त्याचा ख्रिश्चन देशांशी संघर्ष सुरू असल्यानं इथं ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी असून, चुकून कोणी प्रयत्न केल्यास त्याला जबर शिक्षा होते. फ्रान्सकडून 1962 मध्ये स्वतंत्र झालेला मुस्लीम बहुल देश अल्जेरीया, तेलासाठी प्रसिद्ध असलेला श्रीमंत देश ब्रुनेई इथंही ख्रिसमस साजरा करण्यास मनाई आहे. ब्रुनेईत तर ख्रिसमस साजरा केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास किंवा 20 हजार डॉलर्सचा दंड आहे. अफगाणिस्तानमध्ये ख्रिसमस किंवा इतर कोणताही ख्रिश्चन सण साजरा करणं धोक्यापेक्षा कमी नाही आहे
  अफगाणिस्तानमध्ये ख्रिसमस किंवा इतर कोणताही ख्रिश्चन सण साजरा करणं धोक्यापेक्षा कमी नाही आहे
  कोमोरोस या 98 टक्के सुन्नी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या देशातही ख्रिसमसवर बंदी आहे. पाकिस्तान मध्ये 25 डिसेंबर रोजी सुट्टी असते पण ती या देशाचे संस्थापक मोहमद आली जिना यांच्या जयंती निमित्त. इथं ख्रिसमसवर कायदेशीर बंदी नाही पण अल्पसंख्येत असलेल्या ख्रिश्चन लोकांना धोका मात्र आहे. (हे वाचा-नृत्य आणि जीन्स घालायला बायकोनं नकार दिला म्हणून नवऱ्यांनं स्वतःला घेतलं पेटवून) मुस्लीम बहुल कट्टर देश असलेला सौदी अरेबियातही ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी आहे. 2009 मध्ये शरियत कायदा स्वीकारणाऱ्या सोमालियामध्येही 2015 पासून ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लीम देश लिबियामध्ये ख्रिसमसच्या आधी एक दिवस 24 डिसेंबर रोजी या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. येमेनमध्येही गेली अनेक दशकं ख्रिसमस साजरा केला जात नाही. सौदी अरेबियामध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर काही निर्बंध आहेत
  सौदी अरेबियामध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर काही निर्बंध आहेत
  या देशांमध्येही साजरा होत नाही ख्रिसमस भूतान (Bhutan) या बौद्ध धर्मीय देशात दहा हजार ख्रिश्चन लोक आहेत, पण तरीही इथं अधिकृतरित्या ख्रिसमसची सुट्टी नाही. मंगोलियातही (Mangolia) ख्रिश्चन लोक असले तरी इथं ख्रिसमस सण केला जात नाही. सेक्युलर देश अशी प्रतिमा असलेल्या तजाकिस्तानमध्ये  ख्रिसमसवर बंदी आहे. ट्युनिशियात बंदी नाही; मात्र याची सुट्टी नसते. हा दिवस इतर दिवसांसारखाच दिवस असतो. उझबेकिस्तानमध्ये दहा टक्के ख्रिश्चन लोकं आहेत, मात्र इथं ख्रिसमस वेगळा साजरा केला जात नाही. नववर्षाच्या सोहळ्यातच ख्रिसमस सेलिब्रेशन होते. भुतानमध्ये ख्रिसमस साजरा करण्याची परंपरा नाही
  भुतानमध्ये ख्रिसमस साजरा करण्याची परंपरा नाही
  कम्युनिस्ट देश असलेल्या चीनमध्ये (China) ख्रिसमसवर पूर्ण बंदी आहे. इथं हा सर्वसामान्य दिवस आहे. एकेकाळी चीन हा नास्तिक देश होता, त्यामुळे याठिकाणी ख्रिसमसवर पूर्णपणे बंदीच आहे. कम्युनिस्ट देश असल्याचा दावा करणाऱ्या पण हुकुमशाहीसाठी चर्चेत असणाऱ्या उत्तर कोरियातही (North Korea) ख्रिसमस साजरा करण्यावर कायदेशीर बंदी आहे. (हे वाचा-वास्तुशास्त्राचा अनोखा अविष्कार! फुटबाॅलपटू पेलेशिवाय झुकलेल्या इमारतींच आकर्षण) याशिवाय काँगो, मोरोक्को, इजिप्त, सेनेगल, सुदान, या आफ्रिकन देशांमध्ये तसंच आशियातील जपान, बहारीन, कजाकिस्तान, लाओस, कुवेत, नेपाळ, ओमान, थायलंड, मालदीव, व्हिएतनाम, तर मध्यपूर्व देशांमधील इराण, इस्रायल, कतार, तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या