Home /News /lifestyle /

वास्तुशास्त्राचा अनोखा अविष्कार! फुटबाॅलपटू पेलेशिवाय झुकलेल्या इमारतींच आकर्षण

वास्तुशास्त्राचा अनोखा अविष्कार! फुटबाॅलपटू पेलेशिवाय झुकलेल्या इमारतींच आकर्षण

येथील इमारती लोकांना फारच आकर्षित करतात. या इमारतींचे वैशिष्ट त्यांच्या आर्किटेक्टचरमध्ये दडले आहे.

    ब्राझील, 24 डिसेंबर :  ब्राझीलमधील (Brazil) सेंटोस (Santos) शहरातील इमारती या वास्तुशास्त्राचा अनोखा अविष्कार आहेत. पिसाच्या झुकलेल्या मनोऱ्याप्रमाणे (Leaning tower of Pisa) या इमारतींची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे हा अविष्कार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. ब्राझीलमधील सेंटोस हे शहर महान फुटबालपटू पेले (Pele) यांच्यामुळे ओळखले जाते. या शहरात पेले यांचा जन्म झाला होता. परंतु, या शहरात अजून एक अनोखी अशी गोष्ट आहे की ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. येथील इमारती लोकांना फारच आकर्षित करतात. या इमारतींचे वैशिष्ट त्यांच्या आर्किटेक्टचरमध्ये दडले आहे. या शहरातील इमारती या पीसाच्या मनोऱ्याप्रमाणे झुकलेल्या आहेत. सेंटोसमधील (Santos) या इमारती काही काळापासून अशाच आहेत. जसा काळ पुढे जातोय तशा या इमारतींमधील समस्या वाढत असून, त्या अजूनच कलत आहेत. समुद्रावरुन सेंटोस शहरातील या इमारतींकडे पाहिलं तर त्या अधिकच कललेल्या दिसतात. सेंटोसमध्ये सुमारे 651 इमारती अशा प्रकारच्या आहेत. यातील काही इमारती 5 इंचांपर्यंत झुकलेल्या असून त्या फारसे लक्ष वेधून घेत नाहीत, परंतू काही इमारती 2 इंचांपर्यंत झुकलेल्या असून त्या तत्काळ लक्ष वेधून घेतात. असं असलं तरी या इमारती सुरक्षित असल्याने प्रशासनाने त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलेले नाही. हे ही वाचा-मेड इन इंडिया कोरोना लशीचे सकारात्मक परिणाम; COVAXINला आपात्कालीन मंजुरी मिळणार? 1950 आणि 1960 च्या दशकात जेव्हा या इमारती बांधण्यात येत होत्या, त्यावेळी आर्किटेक्टनी सोपा नव्हे तर स्वस्तातला मार्ग अवलंबला. आर्किटेक्टने जर या इमारतींचा पाया अधिक खोल खणला असता तर खर्च वाढला असता, त्यामुळे त्यांनी काॅक्रिट पॅडींगचा वापर केला. हे काॅक्रिट पॅडींग खूप खोल नसतात. ते जमिनीत काही अंतरापर्यंतच खोल जातात. हे इमारतीला वाळू आणि मातीच्या पृष्ठभागावर अलगद ठेवण्यासारखा प्रकार आहे. या इमारती 7मीटर जाड वाळूच्या थरांवर बांधल्या असल्याने त्या दरवर्षी थोड्याफार प्रमाणात झुकत आहेत. इमारती झुकत आहेत तसेच या इमारतींमधील घरांचे आणि खिडक्यांचे दरवाजे नीट बंद होत नाहीत, अशी येथील रहिवाश्यांची तक्रार आहे. जमीन समतल नसल्याने येथील रहिवाश्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या