Home /News /lifestyle /

डान्स करायला आणि जीन्स घालायला बायकोनं नकार दिला म्हणून नवऱ्यांनं स्वतःला घेतलं पेटवून

डान्स करायला आणि जीन्स घालायला बायकोनं नकार दिला म्हणून नवऱ्यांनं स्वतःला घेतलं पेटवून

आपल्याबरोबर नाचायला बायको तयार होत नाही. ती जीन्सही घालत नाही याचा राग येऊन नवऱ्याने सरळ तिला तीन तलाक दिला आणि वर स्वतःलाच पेटवून घेतलं.

    मेरठ, 24 डिसेंबर : आपल्याबरोबर नाचायला बायको तयार होत नाही. ती जीन्सही घालत नाही याचा राग येऊन नवऱ्याने सरळ तिला तीन तलाक दिला. एवढंच नाही तर बायकोला तलाक देऊन या नवऱ्याने स्वतःलाच पेटवून घेतलं. या प्रकरणात वेळीच आग विझवल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. पण परिसरात झाल्या प्रकाराने खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील (UP) मेरठमध्ये (Meerut) ही धक्कादायक घटना घडली आहे. बायकोनं नाचायला आणि जीन्स (Jeans) घालायला नकार दिला म्हणून मेरठच्या एका व्यक्तीनं स्वतःला पेटवून (fire himself)  घेतलं. संबंधित व्यक्तीनं बायकोला तीन तलाक दिला होता. सध्या देशात तीन तलाक देणं कायद्यानं गुन्हा आहे. ही घटना मंगळवारी घडली. तीन तलाक दिल्यानंतर हा माणूस घरी गेला आणि त्याने स्वत: ला पेटवून घेतलं. पण कुटुंबातील सदस्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला आहे. या घटनेनंतर भयभीत झालेल्या सासरच्या कुटुंबीयांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली आहे. दैनिक हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, ही घटना शहरातील लिसरी गेट पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या न्यू इस्माईलनगर भागात घडली. मंगळवारी रात्री संबंधित व्यक्ती आपल्या सासरच्या घरी आला होता. न्यू इस्माईलनगर येथील रहिवासी अमीरुद्दीन यांनी आठ वर्षापूर्वी आपल्या मुलीचं लग्न हापूरच्या पिलखुआ येथे राहणारी अनसशी केली होतं. अनस सध्या दिल्लीत नोकरीला आहे. अनसच्या पत्नीनं असा आरोप केला की, तिचा नवरा तिला नृत्य करण्यास आणि गाणी गाण्यास भाग पाडतो. यामुळे दोघांत नेहमीचं खटके उडत होते. कालांतराने त्यांच्या दोघांमधील वाद वाढतच गेला. या महिलेनं स्थानिक पंचायतीकडेही मदतीसाठी संपर्क साधला होता, पण त्यातून काही तोडगा निघाला नाही. दोन दिवसांपूर्वी अनसने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला. त्यानंतर मंगळवारी रात्री तो आमच्या घरी आला आणि स्वतः च्या अंगावर कोणता तरी ज्वलनशील  द्रव ओतला आणि स्वत: ला पेटवून घेतलं, अशी माहिती पीडित महिलेचे वडील अमीरुद्दीन यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक प्रशांत कपिल करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Suicide, Uttar pradesh

    पुढील बातम्या