मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रिलेशनशीपमध्ये धोका, धार्मिक भावना दुखावणे, नो पार्कींगमध्ये गाडी, Reelsने निलंबन, काय सांगतो कायदा?

रिलेशनशीपमध्ये धोका, धार्मिक भावना दुखावणे, नो पार्कींगमध्ये गाडी, Reelsने निलंबन, काय सांगतो कायदा?

न्याय मिळवायला प्रत्येकवेळी पैसे नाही लागत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कायदेशीर माहिती असल्यास तुम्ही कोणच्याही मदतीशिवाय स्वतः न्याय मिळवू शकता.

न्याय मिळवायला प्रत्येकवेळी पैसे नाही लागत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कायदेशीर माहिती असल्यास तुम्ही कोणच्याही मदतीशिवाय स्वतः न्याय मिळवू शकता.

न्याय मिळवायला प्रत्येकवेळी पैसे नाही लागत. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कायदेशीर माहिती असल्यास तुम्ही कोणच्याही मदतीशिवाय स्वतः न्याय मिळवू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 ऑक्टोबर : शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. त्याला अनेक कारणं आहेत. कायद्याची माहिती नसणे, कोर्टकचेऱ्या करण्यात येणारा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळण्यासाठी लागणारा मोठा कालावधी. पण, हे मत प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. कारण, अनेक गोष्टी तुम्ही कोर्टाची पायरी न चढताच मिळवू शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. योग्य माहिती असल्यास तुम्ही अगदी रुपयाही खर्च न करता कोर्टातून न्याय मिळवू शकता. आणि हिच माहिती देण्यासाठी आम्ही #कायद्याचंबोला हे सदर घेऊन आलो आहोत.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


प्रेम असो की लिव्ह-इन रिलेशनशिप; अनमॅरिड कपल्सना हे नियम माहितीच हवे, अन्यथा होईल अडचण

तुम्ही जर कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असाल किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असाल तर अनमॅरिड कपल्स म्हणून आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा आपण सार्वजनिक पार्कमध्ये फिरायला जातो, हॉटेलवर राहण्याची वेळ येते. किंवा एकाच घरात राहत असाल तर या गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे. सविस्तर वाचण्यासाठी टॅप करा.

पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; घाबरू नका, तुमचं नाव बाहेर न येता होईल बंदोबस्त

तुमचे खाजगी व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत नको त्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या जातात. अशावेळी आपली एक चूक मोठ्या घटनेला आमंत्रित करू शकते. अशा परिस्थितीत आपण न घाबरता सायबर सेलशी संपर्क करायला हवा. सविस्तर वाचण्यासाठी टॅप करा.

'आदिपुरुष'वर बंदी येणार? धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, काय सांगतो कायदा?

बाहुबली फेम प्रभास आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला. हनुमानाच्या वेषभूषेमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप एका खासदाराने केला आहे. अशा परिस्थितीत कायदा काय सांगतो? धार्मिक भावना दुखावणे म्हणजे नेमकं काय? चित्रपटावर प्रदर्शित करण्याची बंदी येऊ शकते का? सविस्तर वाचण्यासाठी टॅप करा.

लग्नाशिवाय कपलने लॉजवर राहणं गुन्हा नाही; हे अधिकार माहिती असतील तर पोलीसही देणार नाहीत त्रास

अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. अट फक्त एकच आहे. सविस्तर वाचण्यासाठी टॅप करा.

ST महिला कंडक्टरच्या एका Reels ने निलंबन! कारवाई योग्य आहे का? कायदेशीर उत्तर

उस्मानाबादमधील एसटी महामंडळाच्या एका महिला कंटक्टरने रिल्स बनवल्यामुळे तिला निलंबित केलं आहे. मात्र, कायदा काय सांगोत? फक्त रिल्स बनवल्याने सस्पेंड करात येतं का? सविस्तर वाचण्यासाठी टॅप करा.

No Parking मध्ये लावलेली गाडी ट्रॅफिक पोलीस थेट उचलू शकतो का? टो केलं तर काय करावं?

बऱ्याचदा नो पार्कींगमध्ये असलेले तुमचे वाहन उचलले जाते. अशावेळी काही नियमांची तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुमचा त्रास कमी होईल. सविस्तर वाचण्यासाठी टॅप करा. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Legal, Relationship, Traffic Rules