मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला: प्रेम असो की लिव्ह-इन रिलेशनशिप; अनमॅरिड कपल्सना हे नियम माहितीच हवे, अन्यथा होईल अडचण

#कायद्याचंबोला: प्रेम असो की लिव्ह-इन रिलेशनशिप; अनमॅरिड कपल्सना हे नियम माहितीच हवे, अन्यथा होईल अडचण

Unmarried Couples Rights: कधीकधी अविवाहित जोडप्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण फार कमी कपल्सना त्यांच्या अधिकाराची जाणीव आहे.

Unmarried Couples Rights: कधीकधी अविवाहित जोडप्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण फार कमी कपल्सना त्यांच्या अधिकाराची जाणीव आहे.

Unmarried Couples Rights: कधीकधी अविवाहित जोडप्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण फार कमी कपल्सना त्यांच्या अधिकाराची जाणीव आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीडचा प्रवीण आणि नागपूरची प्राची दोघेही पुण्यातील प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतानाच त्यांची ओळख झाली. दोघेही पुण्यात नवीन असल्याने त्यांची चांगली गट्टी जमली. पदवीच्या तिसऱ्या वर्षाला जाईपर्यंत दोघांच्या मैत्रीचं रुपांतर कधी प्रेमात झालं हे त्यांनाच कळलं नाही. सुट्टीच्या दिवशी ते हमखास पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे. एक दिवस स्वारगेटजवळच्या सारस बागेत ते नेहमीप्रमाणे गेले होते. गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर हिरवळीवर जाऊन बसले. गप्पा मारता-मारता कधी सायंकाळ झाली त्यांनाही कळलं नाही. तितक्यात तिथं दोन गार्ड आले. त्यांच्या अंगावर खाकी कपडे होती. इथं अश्लील कृत्य करण्यास परवानगी नाही, चला ठाण्यात असं म्हणत एकाने त्यांना दम दिला.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


खरंतर त्या दोघांनी असं काहीच केलं नव्हतं. दोघेही गार्डला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्यावर काहीच उपयोग झाला नाही. शेवटी नाईविलाजाने प्रवीण म्हटला काय असेल तर ते इथच मिटवून घ्या. त्या दोन गार्डनी त्यांच्याकडे हजार रुपयांची मागणी केली. दोघांनी ऐकमेकांच्या बॅगा उचकून सर्व पैसे एकत्र केल्यावर 750 रुपये भरले. गार्डने पैसे खिशात घालत पुन्हा इथं दिसू नका असं म्हणत निघून गेले. अशी वेळ कदाचित तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळे काही नियम माहित असणे आवश्यक आहे. हे नियम जाणून घेतल्याने तुम्ही स्मार्ट तर व्हालच, पण तुमच्या जोडीदारासोबत आरामात राहू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही नियम सांगत आहोत, जे प्रत्येक अविवाहित जोडप्याला माहित असले पाहिजेत.

लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा

लग्न न करता कपल्सने एकत्र राहणे म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. हा ट्रेंड काळाच्या ओघात झपाट्याने वाढला आहे. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपच्या संदर्भात म्हटले होते की, दोन प्रौढ व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी), ज्यामध्ये मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, ते लिव्ह-इनमध्ये राहू शकतात.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, दोन्ही पार्टनर्सना इच्छेनुसार शारीरिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने एका खटल्याचा निकाल देताना सांगितले होते की, प्रौढ झाल्यानंतर व्यक्ती एखाद्या व्यक्तीसोबत राहण्यास किंवा लग्न करण्यास स्वतंत्र असतो. पण ज्याप्रमाणे पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यावर पती पत्नीला खर्च आणि भत्ते देतो, त्याचप्रमाणे लिव्ह-इन नातेसंबंध संपुष्टात आल्यावर न्यायालय अंतिम निर्णय घेईल आणि दंडही ठोठावू शकेल.

हॉटेलमध्ये राहण्याचे नियम

अविवाहित प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नसल्याच्या बातम्या तुम्ही बर्‍याच वेळा ऐकल्या असतील. पण भारतीय कायद्याने प्रौढ जोडप्यांना हा अधिकार दिला आहे की ते कुठेही जाऊ शकतात आणि कोणत्याही हॉटेलमध्ये राहू शकतात. प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्यापासून रोखणारा कोणताही कायदा नाही. मात्र, यासाठी दोन्ही पार्टनर्सना त्यांचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची प्रत द्यावी लागेल. अनेक हॉटेल्समध्ये लोकल आयडी स्वीकारला जात नाही, त्यामुळे हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी कृपया अटी व शर्ती वाचा.

वाचा - #कायद्याचंबोला: पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी; घाबरू नका, तुमचं नाव बाहेर न येता होईल बंदोबस्त

सार्वजनिक ठिकाणी बसण्याचे नियम

तुमचे लग्न झालेले नसले तरी तुम्ही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बसू शकता. आयपीसीच्या कलम 294 अन्वये जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले तर त्याला 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, या कलमाचा गैरवापर होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. सार्वजनिक ठिकाणी असे कोणतेही कृत्य करू नका हे नेहमी लक्षात ठेवा. सार्वजनिक ठिकाणी बसून बोलत असाल तर पोलीस अटक करू शकत नाहीत.

अपमानास्पद भाषेविरुद्ध नियम

जर एखादे जोडपे असे रिलेशनमध्ये असेल, ज्यामध्ये अपमानास्पद किंवा शिवीगाळ होत असल्यास. अशा परिस्थितीत, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 नुसार, मुली संरक्षणाची मागणी करू शकतात.

शारीरिक संबंधांचे नियम

भारतीय संविधानाने अनुच्छेद 21 द्वारे प्रायव्हसीचा अधिकार देण्यात आला आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर, जोडपे खाजगी ठिकाणी एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. सुप्रीम कोर्टाने देखील 2017-2018 मध्ये 2 प्रकरणांवर आपला निर्णय दिला होता. फक्त यात दोघेही प्रौढ असावेत.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Legal, Relationship, Relationship tips