मुंबई, 22 ऑक्टोबर : शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. त्याला अनेक कारणं आहेत. कायद्याची माहिती नसणे, कोर्टकचेऱ्या करण्यात येणारा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय मिळण्यासाठी लागणारा मोठा कालावधी. पण, हे मत प्रत्येकवेळी बरोबरच असेल असं नाही. कारण, अनेक गोष्टी तुम्ही कोर्टाची पायरी न चढताच मिळवू शकतात. फक्त त्यासाठी तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. योग्य माहिती असल्यास तुम्ही अगदी रुपयाही खर्च न करता कोर्टातून न्याय मिळवू शकता. आणि हिच माहिती देण्यासाठी आम्ही #कायद्याचंबोलाहे सदर घेऊन आलो आहोत.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.
जर तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी बेकायदेशीर ताबा मिळवला तर लगेच परत कशी मिळवायची?
तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं असेल तर किंवा ताबा मिळवला असेल तर ती तुम्ही लगेच परत मिळवू शकता. पण, त्यासाठी एक अट आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
..तर खरेदी केलेली प्रॉपर्टी तुमची असूनही तुम्ही मालक कधीच होणार नाही
मालमत्ता व्यवहाराशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये, लोक मुद्रांक शुल्कावरील पैसे वाचवण्यासाठी विक्री करार करण्याऐवजी मुखत्यारपत्र बनवतात. कायद्याच्या दृष्टीने ते योग्य आहे का? त्याचे तोटे काय आहेत? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
रिक्षा-टॅक्सीवाल्यानं भाडे नाकारलं, कॅब ड्रायव्हरने राइड रद्द केल्यास काय करायचं?
रिक्षा-टॅक्सी किंवा कॅबने तुमचं भाडे नाकारल्यास आता त्रास सहन करू नका. मोबाईल काढा अन् लगेच तक्रार करा. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
मापात पाप, शॉपिंगमध्ये लूट; विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर काय करावं?
जर तुमच्याकडून एखाद्या विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले. वस्तू देताना काटा मारला तर तुम्ही घरबसल्या तक्रार करू शकता. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
पती आणि सासरच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार आहे का? काय सांगतो कायदा?
पती आणि सासरच्या मालमत्तेवर अधिकार मिळण्याबाबत कायद्यात काय तरतुदी आहेत. जर पती सांभाळ करत नसेल तर त्याच्या संपत्तीवर दावा करता येतो का? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.