मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला : रिक्षा-टॅक्सीवाल्यानं भाडे नाकारलं, कॅब ड्रायव्हरने राइड रद्द केल्यास काय करायचं?

#कायद्याचंबोला : रिक्षा-टॅक्सीवाल्यानं भाडे नाकारलं, कॅब ड्रायव्हरने राइड रद्द केल्यास काय करायचं?

कॅब ड्रायव्हरने राइड रद्द केल्यास काय करायचं?

कॅब ड्रायव्हरने राइड रद्द केल्यास काय करायचं?

रिक्षा-टॅक्सी किंवा कॅबने तुमचं भाडे नाकारल्यास आता त्रास सहन करू नका. मोबाईल काढा अन् लगेच तक्रार करा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मयुरी पहिल्यांदाच नागपूरहून पुण्याला आली होती. तिची जीवलग मैत्रीण हसूचं लग्न होतं. लग्नाच्या आठवडाभर आधीच हसूचा निरोप आल्याने तिला नाही म्हणता आलं नाही. सकाळी ती वाकडेवाडी बसस्टँडला उतरली. ट्रॉली बॅग ओढत बाहेर आलेल्या मयुरीला काही वेळातच पाचसहा रिक्षा चालकांनी घेरलं. कुठं जायचंय मॅडम? कहा जाना है मॅम? सगळ्यांकडून एकच प्रश्न. शिवाजीनगर म्हटल्यावर मात्र सगळ्यांनी तोंडं वळवली. तिने बाहेर येऊन आणखी चार जणांना विचारलं. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. तिच्याकडे दोनतीन बॅगा असल्याने बसने जाणेही शक्य नव्हतं. अखेर तिने कॅब बूक केली. पंधरा मिनिटांनी तिला नॉटीफिकेशन आलं की तिची राईड रद्द केली आहे. पुण्यात पहिल्यांदा आलेल्या मयुरीसाठी हा अनुभव फार वाईट होता.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


लोकलची गर्दी, बसची चिकचिक म्हणून आपण अनेकदा रिक्षा-टॅक्सी किंवा कॅब सेवा वापरतो. पण, रिक्षा आणि टॅक्सीवाल्याप्रमाणे कॅबवालेही आता ऐनवेळी जवळची राईड रद्द करत असल्याचे अनुभव लोकांना येत आहे. तुम्हालाही असाच अनुभव आला तर कुठे तक्रार करायची हे माहिती असायला हवे, जेणेकरुन पुन्हा अशी परिस्थिती कोणावर ओढावणार नाही. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही मोबाईलवरुनच लगेच तक्रार नोंदवू शकता.

कॅब बुक केल्यानंतर सुरुवातीला ती कन्फर्म होते. पण काही वेळा कॅब ड्रायव्हर ऐन वेळेला अचानक राइड रद्द करतात. यामुळे इतका वेळ कॅबची प्रतीक्षा करणाऱ्या आणि कॅब मिळणार म्हणून निश्चिंत असणाऱ्या प्रवाशाची गैरसोय होते. अशावेळी खूप राग येतो. कॅब ड्रायव्हरने अशी अचानक राइड रद्द करण्याचा त्यांना अधिकार असतो का? असं झाल्यास प्रवाशांनी नेमकं काय करावं? कुठे आणि कशी तक्रार करावी?

अनेकदा तुम्ही प्रवास करताना ऑनलाईन कॅब बूक करता. मात्र, काहीवेळा कॅब ड्रायव्हर तुमची राईड ऐनवेळी रद्द करतात. अशावेळी मोठा मनस्थाप होतो. पण, अशावेळी काय करायचं हे अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करुन नवीन कॅब शोधतात. पण, तुमच्यासोबत असं काही घडलं तर तुम्ही त्याची रितसर तक्रार नोंदवू शकता.

वाचा - भाडेकरू घर सोडेना, घरमालकाची कटकट, चेक झाला बाऊन्स, बँक बुडाली? काय सांगतो कायदा

कुठे करायची तक्रार?

सर्वात आधी तुम्ही ज्या कंपनीची कॅब बूक केली आहे. त्या कंपनीच्या अधिकृत अ‍ॅप किंवा वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकता. उदाहरणार्थ भारतात ओला, उबेर कंपनींनी आपल्या ग्राहकांना अशी सोय उपलब्ध करुन दिली आहे. तुमच्या तक्रारीत तथ्य असेल तर कंपनी योग्य ती कारवाई करते. मात्र, कंपनीच्या कारवाईने तुमचं समाधान झालं नाही किंवा कंपनीने दुर्लक्ष केलं तर तुमच्याकडे आणखी एक पर्याय उपलब्ध आहे.

जर सदर कंपनीने तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर तुम्ही ग्राहक न्यायालयात ऑनलाईन किंवा फोन करुन तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 1800-11-4000 किंवा 1915 वर कॉल करू शकता. येथे त्याचे संभाव्य उपाय किंवा पुढे काय करायचे आहे, ही माहिती दिली जाईल. तुम्ही http://consumerhelpline.gov.in/ या पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही तुमची तक्रार माहिती, कंपनीचे नाव आणि विवाद संबंधित कागदपत्रे देखील संलग्न करू.

वाचा - प्रेम असो की लिव्ह-इन रिलेशनशिप; अनमॅरिड कपल्सना हे नियम माहितीच हवे, अन्यथा..

रिक्षा-टॅक्सीवाल्याने भाडे नाकारल्यास कुठे तक्रार करावी?

रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी जवळचे भाडे नाकारणे हे आता नेहमीचे झाले आहे. बऱ्याचदा परिस्थितीचा गैरफायदा घेत जास्त भाडेही आकारले जाते. असे घडल्यास तुम्ही शहरातील पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार करू शकता. किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस विभागाच्या हँडलला टॅग करुनही तक्रार देऊ शकता.

या संदर्भात मुंबई पोलिसांनी एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, की रिक्षा व टॅक्सी चालक हे लांब पल्ल्याचे भाडे मिळवण्याकरीता बऱ्याचवेळा जवळचे भाडे नाकरत असल्याच्या तक्रारी येत आहे. आमच्या मासिक बैठकीत भाडे नाकारणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Legal, Riksha driver, Taxi Driver