दिवाळी जवळ आल्याने शितलची शॉपिंगसाठी लगबग सुरू होती. मागचे दोन वर्ष कोरोना संसर्गात गेल्याने यावर्षी तिचा उत्साह थोडा जास्तच होता. अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या वस्तूंपर्यंत तिने यादी तयार केली होती. त्याप्रमाणे प्रायोरिटी देखील ठरवली होती. ठरल्याप्रमाणे सर्वात आधी किराणामाल भरण्यासाठी ती जवळच्याच एका दुकानात गेली. यादी तेथील कामगाराकडे दिली आणि पुढच्या नियोजनात गुंतली. काही वेळाने बाजाराची पिशवी आणि बिल तिला देण्यात आलं. तिने वस्तू चेक करत असताना एका ठिकाणी
एमआरपीपेक्षा जास्त पैसे
घेतल्याचे तिच्या लक्षात आलं. तिने ते दुकानदाराच्या लक्षात आणून दिलं. मात्र, दुकानदाराने आम्हाला त्या किमतीत मिळतंय मग वरती नफा नको का? असं उत्तर दिलं. कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज
#कायद्याचंबोला
. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर
Rahul.Punde@nw18.com
या मेलवर आम्हाला सांगा.
अशी परिस्थिती कधीतरी तुमच्यावरही आली असेल. बऱ्याचदा दुकानदार आपल्याला एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू विकतात. साधी पाण्याची बाटली किंवा दुधाची पिशवी घ्यायची म्हटली तरी थंड करण्याचा चार्ज म्हणून अतिरिक्त पैसे आकारले जातात. दोन-तीन रुपये म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अशा बऱ्याच वस्तूंच्या मागे आपली फसवणूक होऊ शकते. अशा वेळी ग्राहकांनाही काही हक्क आहेत, याची जाणीव असली पाहिजे. विक्रेते आणि ग्राहक यांच्यासाठीही काही नियम, कायदे, अटी आहेत. त्यानुसारच वस्तूंची खरेदी-विक्री होते. काही वस्तूंच्या किमती ठरलेल्या असतात. ज्या त्या वस्तूवरच दिलेल्या असतात. याला एमआरपी म्हटलं जातं. एमआरपीनुसार सर्व ठिकाणी त्या वस्तूंचे दर सारखेच असतात. कोणताही दुकानदार त्या वस्तूंवर एमआरपीपेक्षा जादा पैसे आकारू शकत नाही. असं झाल्यास तुम्ही विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल करू शकता. ..तर कारवाई होते पेट्रोल मापात कमी देणे, पॅकिंग वस्तूवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधीकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास महाराष्ट्र शासनाचे वैध मापन शास्त्र विभागाकडून कारवाई केली जाते. वाचा - भाडेकरार पूर्ण वर्षाऐवजी फक्त 11 महिन्यांचाच का? कारण आणि कायदेशीर परिणाम येणाऱ्या सण-उत्सवात ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक 022-22622022, 020-26137114 तसेच 9869691666 या व्हॉटस अप क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in या ईमेल पत्त्यावर संपर्क करून तक्रार नोंदवू शकता. ग्राहक न्यायालयात जाण्याचा अधिकार जर एखाद्या दुकानदाराने तुमची फसवणूक केली किंवा एखादा व्यापारी तुम्हाला महागड्या किमतीत वस्तू विकत असेल तर तुम्ही 8130009809 या क्रमांकावर एसएमएस करून तक्रार करू शकता. एसएमएस व्यतिरिक्त, तुम्ही टोल फ्री ग्राहक हेल्पलाइन नंबरवरही तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 1800-11-4000 किंवा 14404 वर कॉल करू शकता. एसएमएस प्रमाणेच तुमची तक्रार येथे नोंदवली जाईल. त्याचे संभाव्य उपाय किंवा तुम्हाला पुढे काय करायचे आहे, ही माहिती देखील दिली जाते. तुम्ही http://consumerhelpline.gov.in/ पोर्टलवर तुमची नोंदणी करुन तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही तुमची तक्रार माहिती, कंपनीचे नाव आणि विवाद संबंधित कागदपत्रे देखील शेअर करू शकता.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)