पावसाळ्यात कोरोनाव्हायरसचा धोका अधिक वाढणार; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?

पावसाळ्यात कोरोनाव्हायरसचा धोका अधिक वाढणार; काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?

पावसाळ्यातील (rainy season) वातावरण आजारांसाठी अनुकूल असतं.

  • Share this:

मुंबई, 31 मे : डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाव्हायरसचा (coronavirus) उद्रेक झाला, त्यावेळी उन्हाळ्यात (summer) या व्हायरसचा नाश होईल, असं मानलं जातं होतं. मात्र तसं झालं नाही. आता पावसाळ्यात (monsoon) कोरोनाव्हायरसचा धोका वाढणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पावसाळ्यातील (rainy season) वातावरण आजारांसाठी अनुकूल असतं, त्यामुळे इतर व्हायरसप्रमाणे कोरोनाव्हायरसचाही धोका अधिक वाढू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेयरमधील एपिडेमिओलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. जेनिफर होर्ने यांनी wboc ला दिलेल्या एका मुलाखतीत पावसावरून चिंता व्यक्त केली. पावसाच्या पाण्यामुळे स्वच्छता राहते असं नाही, शिवाय त्या पाण्यामुळे व्हायरसही नष्ट होत नाही. उलट पावसाळा अनेक मोसमी आजार घेऊन येतो. कोरोनाव्हायरसही इतर व्हायरसप्रमाणेच होईल, असं मानलं जातं आहे.

हे वाचा - World No-Tobacco Day : तंबाखूच्या व्यसनापासून स्वत:ला दूर कसं ठेवाल?

भारतातील तज्ज्ञांची मतंही याच्याशी मिळतीजुळती आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगळुरूचे प्राध्यापक राजेश सुंदरसन यांनी सांगितलं, जसं आपण आपलं दैनंदिन जीवन सुरू करू तसा इन्फेक्शनचा धोका वाझत जाईल. पावसासह हा धोका आणखी वाढेल. दैनिक भास्करमध्ये एम्सच्या कम्युनिटी मेडीसनचे प्राध्यापक डॉ. संजय राय यांनी म्हटलं, कोरोनाव्हायरस आणि पाऊस याबाबत सध्या विशेष अभ्यास करण्यात आलेला नाही. मात्र पावसाळ्यात व्हायरसची सक्रियता कमी नही होणार तर उलट तीव्रता आणखी वाढेल, असं आपण म्हणू शकतो. कारण या कालावधीत तापमान आणि आर्द्रता कोणताही व्हायरस पसरण्यास आणि जास्त कालावधी राहण्यास अनुकूल असतं.

व्हायरस आणि पावसाच्या संबंधांबाबत काय सांगतं संशोधन?

बदलत्या वातावरणाचा व्हायरसवर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत सातत्याने अभ्यास सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरलँड चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या मते, पाण्यामुळे व्हायरसचा नाश होत नाही. उलट आर्द्रता आणि कमी तापमानात व्हायरस जिवंत राहण्याचा आणि वाढण्याचा धोका वाढतो. आता बहुतेक देश लॉकडाऊन हटवत आहेत. यादरम्यान पावसाच्या पाण्याशी संपर्कात आल्याने धोका आणखी वाढेल.

फोर्ब्स मॅगझिनमधील एका रिपोर्टनुसार 2017 साली सायन्स जर्नल इंटरनॅशनल सोसायटी फॉर मायक्रोबियल इकोलॉजीमध्ये प्रसिद्ध संशोधनात म्हटलं आहे की, पावसाचं पाणी बॅक्टेरियांचा नाश करू शकेल मात्र व्हायरससाठी हे अनुकूल वातावरण असतं.

हे वाचा - कोरोनाच्या परिस्थितीत नवजात बाळाची अशी घ्या काळजी

2012 साली झालेल्या एका अभ्यासानुसार,  सायन्स जर्नल करंट ओपिनियन इन व्हायरोलॉजीध्ये प्रसिद्ध संशोधनात शास्त्रज्ञांनी व्हायरस आणि पावसाच्या पाण्याचा काय संबंध आहे, याचा अभ्यास केला. त्यानुसार व्हायरस कसा पसरणार हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. ऋतू, वातावरण, तापमान, आर्द्रता आणि हवा यांचा यात समावेश आहे. श्वसनप्रणालीवर हल्ला करणारे व्हायरस असेच पसरतात.

याला आणखी चांगल्याप्रकारे समजण्यासाठी मलेशियामध्ये अभ्यास करण्यात आला. यावेळी दिसून आलं की, पावसाळ्यात श्वसनप्रणालीवर हल्ला करणारे व्हायरस वेगाने पसरतात.

हे वाचा - क्या बात है! लॉकडाऊननंतर 'हा' देश फिरण्यासाठी पर्यटकांनाच देणार पैसे

भारतातही असे अभ्यास झालेत. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचं प्रमाण वेगवेगळं असल्यानं व्हायरस पसरण्याचं प्रमाणही वेगळं असल्याचं दिसून आलं आहे.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शने आपल्या वेबसाईटवर पाणी आणि कोरोनाव्हायरसबाबत काही माहिती दिलेली नाही. तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरही कोरोना आणि पावसासंबंधी काही अभ्यास नाही. मात्र जसा व्हायरस पसरतो आहे, त्यादृष्टीने ऋतूमानाशी संबंधित संक्रमकता पाहणंही गरजेचं आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

हे वाचा - उकाडा वाढला तरी शरीरात होणार नाही पाण्याची कमी; फॉलो करा 'या' टीप्स

First published: May 31, 2020, 3:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading