तहान लागली नाही तरी मध्ये मध्ये पाणी पित राहा यामुळे डिहायड्रेशनची समस्या बळावणार नाही. शरीरात पाण्याची कमी होऊ नये म्हणून कलिंगड, काकडी, संत्री अशी रसदार फळं खा. घराबाहेर पडताना पाण्याची बाटली न विसरता सोबत घ्या. हात, तोंड आणि डोकं मध्ये मध्ये पाण्याने ओलं करत राहा. यामुळे अंगाची काहिली फारशी होणार नाही. आहारात कच्च्या कांद्याचा समावेश करा. सोबत कच्चा कांदा ठेवणंही चांगलं असं म्हटलं जातं. शक्यतो सुती कपडे घाला जेणेकरून तुम्हाला येणारा घाम शोषला जाईल आणि उकाड्यामुळे तुमची चिडचिड होणार नाही.