कोरोनाच्या काळात जगभरात पर्यटन उद्योगाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे लोकघरात कैद झाले आहेत. त्यामुळं परदेशवारी करणं तर लांबच राहिलं
हा देश आहे जपान. जपान सरकारनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तब्बल 18.2 अब्ज डॉलर्स खर्च करणार असल्याचे जाहीर केले आहे. यात पर्यटकांच्या प्रवासाचा निम्मा खर्च सरकार देणार आहे.
जपानच्या टूरिझम एजन्सीचे प्रमुख हिरोशी तबता यांनी सांगितले की, अर्धा खर्च सरकार करत असेल तर लोकं जपानला फिरण्यासाठी येतील. या योजनेची सविस्तर माहिती अद्याप जाहीर केली गेलेली नाही.
जपान टाइम्सच्य़ा वृत्तानुसार सरकारनं म्हटले आहे की नवीन योजना जुलैपर्यंत सुरू होऊ शकेल. तोपर्यंत जपानमध्ये पर्यटनाला बंदी लागू केली आहे.
पंतप्रधान शिन्झो अबे यांनी सोमवारी देशातून आणीबाणी दूर केली तेव्हा जपानच्या पर्यटन संस्थेने ही घोषणा केली. जपानमधील लोक घरांमधूनही काम करत आहेत आणि लॉकडाऊनमुळं शाळा बंद आहेत.