World No-Tobacco Day : तंबाखूच्या व्यसनापासून स्वत:ला दूर कसं ठेवाल?

World No-Tobacco Day : तंबाखूच्या व्यसनापासून स्वत:ला दूर कसं ठेवाल?

लॉकडाऊनच्या काळात तंबाखूचं व्यसन कसं सोडवता येऊ शकते, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे : वर्षानुवर्षे धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या माणसांचं व्यसन सोडवणं हे खूपच अवघड असतं. पण जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तंबाखूच्या (tobacco) व्यसनापासून दूर जाऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे, हा लॉकडाऊनचा (lockdown) कालावधी हे व्यसन सोडण्यासाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. कारण, सध्या लॉकडाऊनमुळे तंबाखूजन्य पदार्थ आणि दारू लोकांना मिळत नाही. त्यामुळे हीच वेळ आहे तुम्ही व्यसनापासून स्वतःला दूर ठेवू शकता, असं डॉक्टर सांगतात.

लॉकडाऊनच्या काळात तंबाखूच्या व्यसनापासून कसे दूर राहता येऊ शकते. या कालावधीत व्यसनातून माघार घेताना कोणती लक्षणे जाणवतात याची माहिती एशिनय कॅन्सर इन्स्टिट्युटच्या सायको-ऑन्कोलॉजिस्ट प्रांजल डांगे यांनी दिली आहे.

सध्या अचानक दारू आणि सिगारेट मिळणं बंद झाल्याने अनेक लोक व्यसन सोडण्याचा अनुभव घेतील. कारण, कोणतंही व्यसन सोडवताना शरीरात काही विशिष्ट बदल दिसून येतात. डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, निद्रानाश, अंगात थंडी भरणे, क्रॅप येणे असे बदल शरीरात जाणवू लागतात. काही जणांना थकवा, चिडचिड, मनःस्थिती बिघडणे किंवा नैराश्य अशा समस्येला देखील तोंड द्यावे लागते. ही सर्व व्यसनापासून माघार घेण्याची लक्षणे आहेत. या लक्षणांना त्वरीत सामोरे जाणे ही काळाची गरज आहे.

दारू आणि सिगारेट सोडण्याचे सहज-सोपे उपाय

तंबाखूचे व्यसन सोडायचे असल्यास शुगरलेस गम चावून खा. गाजरसारख्या कुरकुरीत गोष्टींची निवड करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. गाजराचा रस नियमित प्यायल्यास दारूचे व्यसन सोडता येऊ शकते.

हे वाचा - पान-तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांना दणका, सरकार करणार ही कडक शिक्षा!

दारू किंवा सिगारेट सेवनाची इच्छा झाल्यास ती टाळण्यासाठी स्वतःचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अन्य कुठल्या तरी कामात व्यस्त करून घ्या. घरात धूम्रपानरहित झोन तयार करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय जुनी गाणी ऐका, मित्रांशी सोशल मिडियावर संवाद साधा, चित्र काढा, पुस्तक वाचणे किंवा बागकाम करणे अशा कामांमध्ये स्वतः रमवून घ्या. यामुळे तुमचे मन आनंदी आणि प्रसन्न राहिल.

व्यसन करणाऱ्या मित्रांपासून सहसा दूर राहण्याचा प्रयत्न करा.

धूम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राचा आधार घेऊ शकता. याशिवाय आपण स्वतःचे समुपदेशन देखील करू शकता.

व्यसनमुक्त झालेल्या एखाद्या व्यक्तीची मदत घेण्याचाही प्रयत्न करा. यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.

हे वाचा - कोरोनाच्या काळात बहुतांश महिला 'या' त्रासाला कंटाळल्या, धक्कादायक माहिती उघड

इच्छाशक्ती असल्यास कुठल्याही व्यसनापासून दूर राहता येऊ शकतं. यासाठी सुरूवातीला एखाद्या व्यक्तीने ठरवले की, आपणं सलग तीन दिवस व्यसन करणार नाही. त्यानंतर आणखीन सहा दिवस असे जवळपास महिनाभर व्यसन न केल्यास संबंधित व्यक्तीला त्याची सवय होऊन जाते. कालांतराने हळूहळू ही व्यक्ती व्यसनापासून दूर जाते.

व्यसन सोडवण्यासाठी व्यक्तीचे मन स्थिर असणे गरजेचे आहे. यासाठी नियमित ध्यान, योगा करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. यात चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. परंतु, अन्य व्यायाम प्रकार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे गरजेचं आहे.

हे वाचा - हातांमार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका; मग आता पायांनीच लिफ्ट चालणार

मानसशास्त्रज्ञ किंवा मनोचिकित्सकांचे समुपदेशन करणारे मानसिक आरोग्य व्यावसायिक आपल्याला आपला ताण कमी करण्यास निश्चितपणे मदत करतील आणि परिस्थितीशी सामोरे जाण्यास मदत करतील. एखाद्याने मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून मदत घ्यायला अजिबात संकोच करू नये.

First published: May 31, 2020, 7:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading