कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत अनेक गरोदर महिला स्वत:ची नीट काळजी घेत आहेत, जेणेकरून बाळाला त्रास होणार नाही. मात्र बाळ जन्मल्यानंतरही त्याला कोरोनाव्हायरसपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यायला हवी. मेयोक्लिनिकने यासाठी काही टीप्स दिल्यात.
तुम्ही घरापासून दूर असाल आणि तुम्हाला बाळाला भेटायची इच्छा असेल तर त्याला प्रत्यक्ष भेटण्याचा मोह आवारा. सोशल मीडियाचा वापर करून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बाळाला भेटा.
आईला कोरोनाव्हायरसची लागण झालेली असेल तर तिनं बाळाला स्तनपान करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. मास्क वापरावा, बाळाला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.