तुम्हाला देशभर फिरायला आवडतं तर हे खास पॅकेज तुमच्यासाठीच आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) तुमच्यासाठी पूर्व हिमालय फिरण्यासाठी एक खास पॅकेज तयार केलं आहे. या पॅकेजचं नाव आहे 'इस्टर्न ट्रायंगल एअर पॅकेज.' या ऑफरची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे हे तुमच्या बजेटमध्ये बसतं. यात पूर्व हिमालयातील वेगवेगळ्या जागी पाच रात्री आणि सहा दिवस राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच स्पेशल पॅकेजबद्दल थोडं अधिक जाणून घेऊ...
'इस्टर्न ट्रायंगल एअर पॅकेज'मध्ये नक्की काय मिळणार-
यात तुम्हाला पूर्व हिमालयातील कलीमपोंग, त्सोमगो लेक, बाबा हरभजन सिंह मेमोरियल, गंगटोक शहर, हनुमान टोक, गणेश टोक, ताशी व्यू पॉइन्ट, ब्रेबॉर्न पार्क, टाइगर हिल, घूम मठ, बटासिया लूप, जपानी मंदिर, प्राणीसंंग्रहालय, एचएमआय, तिब्बती हस्तशिल्प केंद्र आणि फ्लॉवर पॉइन्टपासून 52 किमी दूर असणारी इतर प्रेक्षणीय स्थळं पाहता येतील.
24 नोव्हेंबर 2019 पासून सुरू होईल टूर-
24 नोव्हेंबर 2019 पासून पूर्व हिमालयाच्या या खास टूरला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही तीन लोकांसोबत गेलात तर तुम्हाला 32 हजार 620 रुपये द्यावे लागतील. तसेच दोघंच जर या ट्रिपवर जाणार असाल तर 34 हजार 520 रुपये द्यावे लागतील. तसेच तुमच्यासोबत पाच ते 11 वर्षांची मुलं असतील तर प्रती व्यक्ती तुम्हाला 28 हजार 810 रुपये आणि दोन ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 22 हजार 450 अतिरिक्त रुपये भरावे लागतील.
कुठून मिळेल फ्लाइट-
मुंबई आणि दिल्लीवरून पूर्व हिमालयला जाण्यासाठी तुम्हाला फ्लाइट मिळेल. याशिवाय दिल्लीच्या बागडोगरा एअरपोर्टवरून या फ्लाइट मिळतील.
सुई लावताना बाळ रडू नये म्हणून डॉक्टरने केलं असं काही की तुम्हीही कराल कौतुक
आपल्या पार्टनर सोबत करा हे काम, घरात नांदेल सुखच सुख!
जगातभारी! चक्क बॉसनं धुतले कर्माचाऱ्यांचे पाय, पाहा VIRAL VIDEO
तुम्हाला स्पर्म काउंट वाढवायचाय? तर 'ही' गोष्ट दररोज खा, नक्कीच होणार फायदा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा