

दररोजचे ताण-तणाव, लाइफस्टाइल यामुळे पुरुषांच्या वंध्यत्वाचं (Men Fertility)प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.


दररोजच्या आहारात वापरला जाणाऱ्या टोमॅटोमुळे स्पर्म काउंट वाढू शकतो असं शास्त्रज्ञांना आढळून आलंय.


टोमॅटोमध्ये 'लाइकोपीन' नावाचा घटक असतो. त्यामुळेच टोमॅटोंना लाल रंग येतो. त्याच 'लाइकोपीन'मध्ये स्पर्म काउंट वाढविण्याची तत्व असल्याचं आढळून आलंय.


ब्रिटनच्या Sheffield Universityमध्ये याबाबतचं संशोधन करण्यात आलंय. त्यात 20 ते 30 वर्ष वयोगटाच्या माणसांवर संशोधन करण्यात आलंय.


त्यात सगळ्यांना 12 आढवडे 'लेक्टोलाइकोपीन' देण्यात आलं. त्यानंतर जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांचं स्पर्म काउंट वाढण्यात आल्याचं आढळून आलंय.


यावर आणखी संशोधन सुरू असून 'लाइकोपीन'पासून दररोज घेता येणाऱ्या गोळ्या तयार करता येवू शकतात का? याचा अभ्यास करण्यात येणार आहे.