सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बाळाच्या रक्ताची चाचणी घेण्यासाठी डॉक्टरला त्याला सुई टोचायची होती. पण सुईमुळे बाळ रडणार हे माहीत असल्याचमुळे डॉक्टराने बाळाचं लक्ष विचलीत करण्यासाठी चक्क गाणं गायलं. सुई टोचताना डॉक्टरने अमेरकन गायक नॅट किंग कोलचं 'अनफरगटेबल' हे गाणं गायलं. इंटरनेटवर सध्या हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि लोकांना आवडतही आहे.
Raigmore Hospital चे डॉक्टर रयान कोएत्जी म्हणाले की, ते अनेकदा रुग्णांसाठी गाणं गातात. कामाच्यावेळी गाणं गुणगुणत राहिल्याने सतत ताजंतवानं वाटतं. विशेष म्हणजे त्या डॉक्टरने क्लासिकल संगीत शिकले आहे. हा व्हिडीओ बाळाच्या आईने शूट केला. पण आता हाच व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओत बाळ फार शांतपणे गाणं ऐकताना आणि डॉक्टरांना एकटक पाहताना दिसत आहे. बाळ ते गाणं ऐकण्यात एवढं मग्न झालं होतं की त्याला सुई टोचली हे कळलंही नाही.
बाळाच्या आईने लिहिले की, याआधी रक्ताच्या चाचणीवेळी बाळ नेहमीच रडायचं. रक्ताच्या चाचणीनंतर माझी मुलगी फार अस्वस्थ असायची आणि असं अनेकदा झालं. पण पहिल्यांना असं झालं की तिला सुई टोचली आणि तिला कळलंच नाही ती शांत होती. ती रडलीही नाही.
आपल्या पार्टनर सोबत करा हे काम, घरात नांदेल सुखच सुख!
जगातभारी! चक्क बॉसनं धुतले कर्माचाऱ्यांचे पाय, पाहा VIRAL VIDEO
तुम्हाला स्पर्म काउंट वाढवायचाय? तर 'ही' गोष्ट दररोज खा, नक्कीच होणार फायदा