बिजींग, 11 नोव्हेंबर : कर्मचारी आणि बॉस यांचे नाते नेहमीच कामापुरती असते. फार क्वचितच बॉस कर्मचाऱ्यांचा मित्र होऊ शकतो. याचे कारण म्हणजे एक बॉस आपल्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेण्यासाठी कोहीही करू शकतो. मात्र तुम्ही कधी एका बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांचे पाय धुतले आहेत? हे वाचून तुम्हाला एकतर आश्चर्य वाटेल किंवा हसू येईल. मात्र हा असा प्रकार घडला आहे. चीनच्या एका कंपनीमध्ये दोन बॉसनी चक्क आपल्या कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्याचा प्रकार घडला आहे. याचे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांमुळे कंपनीला झालेला फायद्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी ही आयडिया काढली होती. या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना स्टेजवर बोलवून त्यांचे पाय धुतले. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा- VIDEO : अश्रूंचे झाले मोती, धोनीच्या संतापामुळे दीपक चाहर झाला डेथ ओव्हर किंग! चीनच्या कॉस्मॅटिक कंपनीला यंदाच्या वर्षात दुप्पट फायदा झाला. त्यामुळं कर्मचाऱ्यांसाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चांगली कामगिरी करणाऱ्या 8 कर्मचाऱ्यांचे पाय धुवून त्यांना सन्मानित केले. कंपनीच्या टॉप सेल्स अधिकाऱ्यांना ही वागणुक दिल्यामुळं जगभरातून या कंपनीच्या बॉसचे कौतुक केले जात आहे. डेली मेल या वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं 8 कर्मचाऱ्यांना पार्टीमध्ये स्टेजवर आमंत्रित केले. त्यांना स्टेजवर खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्यानंतर बॉसनं स्वत: या कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. याबाबत कंपनीच्या मालकानं, “कर्मचाऱ्यांना अवॉर्ड सर्व कंपनी देतात. पण आम्ही त्यांना प्रेरणा देण्यासाठी काही तरी वेगळे करण्याचा विचार केला. म्हणून कर्मचाऱ्यांचे मनोबर वाढवण्यासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आम्ही पाय धुतले”, असे सांगितले. वाचा- जाणून घ्या पॅन कार्डचा ‘हा’ महत्त्वाचा नियम, नाही तर भरावा लागेल 10 हजारांचा दंड
वाचा- VIDEO : रेड ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलानं केला HOT डान्स, चाहते म्हणाले… सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याचबरोबर कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर करत आपल्या बॉसला ट्रोल केले आहे. एका युझरनं, “कंपनी कर्मचाऱ्यांची कदर आहे, हे पाहून आनंद झाला. या सगळ्या गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांने मनोबल वाढते” असे सांगितले. तर, आणखी एक युझरनं, “कर्मचाऱ्यांचे पाय तर धुतले पण त्यांना बोनसही दिला पाहिजे सांगला. तरी हा सगळ्यांसाठी मोठा सन्मान आहे’’, असे लिहिले.