मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हीच वेळ पाल्यांचे मित्र होण्याची! शारीरिक बदलाच्या काळात व्हा खरे मार्गदर्शक

हीच वेळ पाल्यांचे मित्र होण्याची! शारीरिक बदलाच्या काळात व्हा खरे मार्गदर्शक

प्रत्येकाच्या शरीरात वयाच्या ठराविक टप्प्यावर काही बदल (Certain Change) होतात. त्या बदलांचा अर्थ न कळल्याने गोंधळलेल्या मुलामुलींना पालकांनीच आधार (Parents Support) द्यायचा असतो.

प्रत्येकाच्या शरीरात वयाच्या ठराविक टप्प्यावर काही बदल (Certain Change) होतात. त्या बदलांचा अर्थ न कळल्याने गोंधळलेल्या मुलामुलींना पालकांनीच आधार (Parents Support) द्यायचा असतो.

प्रत्येकाच्या शरीरात वयाच्या ठराविक टप्प्यावर काही बदल (Certain Change) होतात. त्या बदलांचा अर्थ न कळल्याने गोंधळलेल्या मुलामुलींना पालकांनीच आधार (Parents Support) द्यायचा असतो.

  • Published by:  News18 Desk
दिल्ली, 16 ऑगस्ट : पौगंडावस्था (Adolescence) मुलामुलींच्या आणि पालकांच्या परीक्षेचा काळ असतो. 12 ते 14 वर्षे वयाच्या मुलामुलींमध्ये शारीरिक बदल वेगाने (Physical Changes) व्हायला लागतात. या बदलांची कल्पना त्यांना नसते. त्यामुळे असे बदल शरीरात का होत आहेत? माझ्याच शरीरात हे बदल होत आहेत का ? किंवा त्या बदलांचा आता माझ्या आयुष्यावर परिणाम होणार का ? असे एक ना हजार प्रश्न त्यांच्या मनात (Questions In Mind) डोकावत असतात. एकीकडे हे बदल होत असतांना त्यांचा अर्थ (Meaning) न कळल्याने मुलामुलींची चिडचिड व्हायला लागते. हा काळ शालेय वर्षांतला महत्वाचा काळही असतो. त्याचवेळी पालक मात्र मुलं मोठी होत आहेत म्हणजे त्यांनी समजुदारपणे वागावं (Behave Sensibly) अशी अपेक्षा करत असतात. त्यामुळे त्यांचा ओरडा खाल्ल्याने व्दिधा मनस्थितीत जगणारी ही मुलंमुली कोमेजून जातात. त्यामुळे पालकांनी या काळात जास्त सजगता दाखवणं अपेक्षीत असतं. पण,पालकांसाठी मुलांमधील हा बदल कल्पनेपलीकडचा नक्कीच नसतो. आवश्यकता असते ती आपण त्या वयात जाऊन विचार करण्याची. वास्तविक विचार केला तर, प्रत्येक पालक पौंगडावस्थेमधून गेलेले असतात तरी,पालकांच्या भूमिकेत आल्यावर तेव्हाचा काळ विसरतात. मुलामुलींमध्ये 12 ते 14 आणि 14 ते 16 या वर्षांमध्ये बदल होतांना पालकांनी आपली भूमिका (Parets Role) बदलण्याची गरज असते. (पालकांची ‘ही’ सवय मुलांच्या मनावर करते खोल परिणाम; आत्मविश्वास होतो कमी) मुलामुलींमध्ये कोणते बदल होतात? 1. या काळात उंची आणि वजन झपाट्याने वाढतं. म्हणजे उंची प्रौढपणीच्या 90 % आणि वजन प्रौढपणीच्या 70 % होतं. 2. मुलांचा बांधा खांद्याजवळ रुंद होतो. आवाजात बदल होतो. मिसरूड येतं. तर, मुली स्त्रीत्वाकडे झुकू लागतात. 3. मुंलाचे लैंगिक इद्रिंये आकाराने आणि शक्तीने विकसीत होतात. तर, मुलींचे वक्षस्थळ,मांड्या,नितंब यांना आकार प्राप्त होतो. (पावसाळ्यातही आहाराकडे द्या लक्ष! वजन वाढलं तर, रोज खा या 2 गोष्टी) 4. मुलींना मासिक पाळी येऊ लागते. सुरवातीला ओटीपोट, कंबर, पाठ दुखते. पोटऱ्यांना गोळे, सुज,चक्कर,उलट्या हा त्रास होतो. त्यामुळे मुली चिडचिड करता. 5. मुलं किंवा मुलींमध्ये विकासाची गती जलद असल्याने थकवा,सुस्ती आणि उदासिनता येते. खाण्यापिण्यात चोखंदळपणा दाखवतात. 6. लैंगिक ग्रथींच्या स्त्रावामुळे कामवासना निर्माण होते. त्यामुळे मुलामुलींच्या वागण्यात संकोच निर्माण होतो. 7. मुलामुलींची जननेंद्रिय वयाच्या 15व्या वर्षापर्यंत पूर्णपणे विकसित होतात. त्यावर केसांची वाढ व्हायला सुरुवात होते. (झोपेत होईल वजन कमी! आधी रात्री होणाऱ्या चुका टाळायला तर शिका) पालकांची भूमिका 1 सर्वातआधी पालकांनी धिराची भूमिका घ्यावी. मुलामुलींनी कितीही चिडचिड केली तरी, समजूतदारपणा दाखवावा. त्यांच्यामध्ये होणारे बदल त्यांना कळत नसले तरी, पालक म्हणून समजून घ्यावेत. 2. याकाळात मुलींना जास्त जपावं लागतं. मासिक पाळी म्हणजे नेमकं काय याची माहिती द्यावी. शक्यतो गर्भधारणा म्हणजे काय आणि बाळाचा जन्म कसा होतो. याची वस्तूनिष्ठ माहिती द्यावी. 3. याच काळात शरीरात उत्पन्न होणारी लैंगिक भावना नवीन असल्याने त्यावर ताबा ठेवण्याची माहिती नसल्याने जवळीक वाढू शकते. 4. मुलगा असो किंवा मुलगी त्यांना एकत्र राहुनही सुरक्षित अंतर राखून एकत्र राहण्याची, खेळण्याची सवय लावावी. (Vastu Tips: छोटे उपाय देतील मोठे फायदे; अडचणी संपून पैशाचा पडेल पाऊस) 5. मुलामुलींना एकत्र खेळण्यास मनाई करू नये. यामुळे त्यांच्यांत जास्त कुतूहल निर्माण होतं आणि अनावश्यक धाडस वाढतं. 6. आत्मसंयमाचं महत्त्व शिकवावं. त्यासाठी खेळ,व्यायाम,योगासनांची आवड निर्माण करावी. 7. या काळात घडलेल्या चुका दिर्घकालीन परिणाम करतात. त्यामुळे भविष्याचा विचार करून त्यांना शारीरिक आणि भावनिक गुंतवणूक यांच महत्त्व सांगावं. मुलंमुली त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यामधून जातात. पालकच या काळात त्यांचे खरे साथीदार असतात. पौगंडावस्थेत त्यांची भावनिक घडी विस्कटली तर, विकृतही बळावू शकते. त्यामुळे या काळात आपल्या पाल्याचे मित्र व्हा.
First published:

Tags: Parents and child, Relationship, Relationship tips, Save relationship

पुढील बातम्या