Home /News /lifestyle /

तुमची ‘ही’ सवय मुलांच्या मनावर करते खोल परिणाम; आत्मविश्वास होतो कमी

तुमची ‘ही’ सवय मुलांच्या मनावर करते खोल परिणाम; आत्मविश्वास होतो कमी

प्रत्येक मूलाचा विकास त्याच्या आसपासच्या वातावरणावरही अवलंबून असतो.

प्रत्येक मूलाचा विकास त्याच्या आसपासच्या वातावरणावरही अवलंबून असतो.

ज्या पालकांना मुलांची तुलना करण्याची वाईट सवय असेल त्यांनी ती आधी बंद करा. याचे मुलांच्या मनावर दुरगामी परिणाम होतात.

    नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : मुलांच्या वाढीमध्ये पालकांची महत्त्वाची भूमिका (Parents Play an Important Role) असते. लहापणी त्यांना जी वागणूक मिळते. त्यातूनचं त्यांच व्यक्तिमत्व (Personality) घडत असतं. त्यासाठी मुलांबरोबर बोलतांनाही व्यवस्थित विचार(Thinking)करावा. कित्येक पालक आपली स्वप्न (Dreem)मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मुलामध्ये असलेली कोणतीही कमतरता त्यांना सहन होत नाही. त्यामुळे मुंलांची इतर मुलांबरोबर तुलना (Comparison of Child) करून मुलांवर दबाव टाकतात. पण, पालकांचा हा प्रयत्न चुकीचा असतो. मुलांची तुलना इतर मुलांशी केली तर,पालक कधीच समाधानी (Satisfaction) होत नाहीत. याशिवाय नकारात्मक भावना (Negative Felling) मुलांमध्ये जन्म घ्यायला लागतात. त्यानंतर पालकांसाठी मोठी समस्या(Problem)ठरू शकते. दोन मुलं कधीही सारखी नसतात त्यामुळे तुलना करून त्याने मुलांच्या गुणवत्तेवर(Quality) करू शकणार नाही. स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळा पालकांना असं वाटतं की जर मुलांची इतरांशी तुलना केली तर मुलं लवकर शिकतील पण, तसं नसतं. पण, मुलांची चांगली वाढ आपल्या पालकत्वावर अवलंबून असतं. आपण मुलांना ज्याप्रकारे विचार करायला शिकवता त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे चांगले पालक होण्यासाठी स्वतःचा सकारात्मक दृष्टीकोन असणं खूप महत्वाचं आहे. (work from home tips : वर्क डेस्कवर ठेवा 'ही' झाडं; वाढेल कामाचा उत्साह) तुलना करणं चुकीचं प्रत्येक मुलाचा विकास त्याच्या आसपासच्या वातावरणावरही अवलंबून असतो. शारीरिकता,सामाजिक क्षमता आणि कोणतंही काम करण्याचं कौशल्य हे सर्व तो त्याच्या घरातून आणि आसपासच्या वातावरणातून शिकतो. दोन मुलांचं संगोपन वेगळ्या प्रकारे होत असेल तर त्यांची वागण्याची पद्धत देखील वेगळीच असणार. त्यामुळे मुलांची तुलना करणे चुकीचं ठरतं. (‘ही’ चिन्ह शरीरावर असतील तर, ती मुलगी असेत Lucky; तुम्ही आहात का भाग्यवान?) परिणाम काय होतो? मुलांची तुलना करणाऱ्या कुटुंबात खेळीमेळीचं वातावरण राहत नाही. त्यामुळे पालक आणि मुलामध्ये अंतर निर्माण होतं. इतर अनेक प्रश्न निर्माण होतात. तुलना करण्याने मुंलांच्या मनावर दबाव येतो. जेव्हा मुलं पालकांच्या अपेक्षेनुसार वागत नाही,तेव्हा ते मनातल्यामनात भीती किंवा दडपणाखाली जगू लागतात. एवढंच नाही तर ते त्यांच्या अचीवमेन्टचा आनंदही घेऊ शकत नाही. त्यांच्या मनात हरण्याची भीती वाढायला लागते. (प्रेग्नन्सीत खाल्ला जाणारा हा पदार्थ महिलांच्या लैंगिक समस्यांवरही उपयुक्त) विश्वास दर्शवणं आवश्यक आपला मुलांवर पूर्ण विश्वास असल्याची भावना त्यांच्यासमोर व्यक्त करा. घरच्यांचा आपल्यावर विश्वास आहे ही भावना त्यांना जबाबदारीची जाणीव देत राहते. मुलांच्या विकासासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टी करणं टाळतात. (हरहुन्नरी IAS ऑफिसर प्रियांका शुक्ला; झोपडपट्टीतल्या महिलेमुळे बदललं आयुष्य) प्रशंसा करा मुलांच्या छोट्या कामगिरीचं कौतुक करा. यामुळे त्यांच्या मनात पुढे जात राहण्याची हिंमत येईल. संयम आवश्यक पेरेन्टिग म्हणजे केवळ प्रेम नाही तर, त्यासाठी संयमही महत्वाचा आहे. चूक झाल्यावर मुलांना सुधारण्याची संधी द्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आनंद घ्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: FAMILY, Lifestyle, Parents and child

    पुढील बातम्या