जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu Tips: छोटे उपाय देतील मोठे फायदे; अडचणी संपून पैशाचा पडेल पाऊस

Vastu Tips: छोटे उपाय देतील मोठे फायदे; अडचणी संपून पैशाचा पडेल पाऊस

Vastu Tips: छोटे उपाय देतील मोठे फायदे; अडचणी संपून पैशाचा पडेल पाऊस

वास्तुशास्त्रानुसार जर कठोर परिश्रम करूनही पैसा येण्यातच अडथळे येत असतील तर, घरात काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन वास्तु दोष दूर करता येतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : प्रत्येकाला घरात सुख आणि समृद्धी असं वाटत असतं. बर्‍याच वेळा असंही घडतं की आपण आपलं काम 100% चांगलं केलं तरी, आपल्याला आपल्या परिश्रमाचं**(Diligence****)** पूर्ण फळ मिळत नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी, लहानलहान गोष्टींचे अडथळे (Problem) येऊ लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. वास्तुशास्त्रानुसार (According to Vaastu Shastra**)** काही गोष्टी घरात असणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात नकारात्मक उर्जा **(**Negative Energy) वाढून, कौटुंबिक कलह **(**Family Feud), कर्जाची वाढ,आर्थिक संकटं अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत अडकलेल्या माणसाला काहीच सुचत नाही. बरेच लोक तक्रार करतात की सर्व प्रयत्नांनंतरही पैशांची बचत होत नाही किंवा नेहमीच पैशांची कमतरता असते. यामागील कारणही वास्तू दोष असू शकतो. घरामधील वास्तू दोष जाऊन पैशांची अडचण कमी व्हावी असं वाटत असेल तर, काही वास्तू टिप्सचा वापर करू शकता.गंभीर वास्तू दोष टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्याच भागात किंवा त्या बाजूला झाडू ठेवू नये. याला गंभीर वास्तू दोष मानलं जातं. घरात टॉयलेट-बाथरुमचे दरवाजे उघडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरात गळके पाण्याचे नळ ठेवू नका. नळ खराब असतील तर ते त्वरित दुरुस्त करा आणि पाणी पडत राहणार नाही याची काळजी घ्या. ( शरीर देतं लो ब्लड शुगरचे संकेत; दुर्लक्ष केल्यास कमी होईल स्मरणशक्ती ) घर बांधताना घराच्या पूर्व दिशेला उंच भिंत बांधू नये. त्यामुळे सूर्याची किरणं घरात येण्याला अडथळा निर्माण होतो. वास्तू दोष दूर करण्यासाठी, आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात घाण होणार नाही याची काळजी घ्यावी. हा भाग  खराब ठेवल्याने देवी लक्ष्मी कोपते असं मानलं जातं. वास्तू दोष दूर करण्यासाठी काटेरी झाडं असतील तर काढून टाका. ( गर्भावस्थेत नको ब्युटीपार्लरमध्ये जाण्याचा त्रास; घरच्याघरीच घ्या त्वचेची काळजी ) बर्‍याचदा आपण आजारी असताना बरीच औषधं आणतो,पण बरं झाल्यानंतरही ती औषधं आपल्या घरात राहतात. निरुपयोगी औषधं रोग वाढवतात. म्हणून,निरुपयोगी औषधं घरात ठेवू नका. ( work from home tips : वर्क डेस्कवर ठेवा ‘ही’ झाडं; वाढेल कामाचा उत्साह ) वास्तुशास्त्रानुसार बुडणाऱ्या जहाजाचं चित्रं आपल्या घरात ठेवू नये. ते निराशेचं प्रतीक मानलं जातं. असे फोटो किंवा पेंटिंग मनात नकारात्मक विचार वाढवू शकतात. ज्या घरात मोडलेल्या मूर्ती आणि वस्तू ठेवलेल्या असतील तिथे सुख-शांती नांदत नाही. यामुळे घरातील सदस्यांवर काठीण प्रसंग ओढावतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात