स्लिम ट्रिम होण्याचं स्वप्न पाहत असाल आणि त्याकरता वेळ देणं शक्य नसेल. नोकरीमुळे आणि रोजच्या धावपळीमुळे डायट प्लॅन फॉलो करणं शक्य नसेल तर, झोपण्याआधी काही टिप्स वापरुन तुम्ही आपलं वजन कमी करू शकता.
रात्री झोपताना होणाऱ्या चुका आपल्या वजन कमी करण्याच्या स्वप्नाला सुरूंग लावतात. तुमच्याकडून ही या चुका होत असतील तर,त्या टाळण्याचा मार्ग पहा.
रात्री सातनंतर खाणं-पिणं बंद करा. सूर्यास्तानंतर आपण जे खातो त्याची एनर्जी बनण्याऐवजी फॅट तयार होतं. म्हणूनच सकाळी भरपूर नाष्टा करावा, दुपारचं जेवण मध्यम एनर्जी देणारं असावं तर, रात्रीचं जेवण अतिशय हलकं घ्यावं असं सांगितलं जातं. त्यामुळेच रात्री सातनंतर कोणत्याही प्रकारचा आहार घेऊ नये.
रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असणारे पदार्थ टाळा. हे पदार्थ पचण्यास अतिशय जड असतात. त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो भाज्या आणि फळांचा वापर करा.
संध्याकाळी सातनंतर जेवण झाल्यावर चहा-कॉफी मुळीच घेऊ नका. चहा किंवा कॉफीमध्ये कॅफेन असतं. यामुळे आपली झोप कमी होते. याशिवाय मेटाबॉलिजम कमी होत जातं. म्हणूनच रात्री झोपण्याआधी चहा-कॉफी टाळावी.
काही जणांना रात्री जेवल्यानंतर चालायची सवय असते मात्र, जेवल्यानंतर कमीत कमी फिजिकल एक्ससाईज कराव्यात. व्यायाम चुकूनही रात्रीच्या वेळी करू नये. यामुळे त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतात.