• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • जेवल्यानंतर घ्यावी लागते टॉयलेटकडे धाव? हा आजार असू शकतं कारण

जेवल्यानंतर घ्यावी लागते टॉयलेटकडे धाव? हा आजार असू शकतं कारण

रात्रीचं जेवण वेळेवर घ्यायची सवय लावा.

रात्रीचं जेवण वेळेवर घ्यायची सवय लावा.

शौचाचा त्रास असेल तर, कुठेही बाहेर गेल्यावर जेवण्याची भीती वाटते. त्यामुळे भूक लागलेली असूनही जेवण टाळायची सवय लागते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : विचार करुन पाहा एखाद्या कार्यक्रमाला, पार्टीला गेले आहात, चविष्ठ पदार्थ (Testy Food) ठेवलेले आहेत. भूकही लागली आहे आणि तोंडाला पाणी सुटलं आहे. पण, त्यांना हात लावायची भीती (Fear) वाटते आहे. कारण, जेवल्यावर लगेच टॉयलेटकडे (Toilet) जावं लागेल हे माहिती आहे. हा त्रास ज्यांना आहे तेच ही कल्पना करू शकतात. हा त्रास फक्त भीती पूरताच मर्यादित नाही तर, खूपदा हा त्रास जास्त प्रमाणात होतो. कारण, शौचाच्या या त्रासाने वजन कमी (Weigh Loss) व्हायला लागतं. काही लोक या त्रासाला कंटाळून जेवण कमी (Avoid Food) करतात. पण, त्याचाही उलटा त्रास व्हायला लागतो. अशक्तपणाही (Weakness) येऊ शकतो. हा त्रास म्हणजे नेमका काय असतो जाणून घेऊयात. जेवल्यानंतर लगेच शौचाला जावं लागत असेल तर, त्याला गॅस्ट्रोकॉलिक रिफलक्स (Gastroesophageal reflux) म्हणतात. ज्या लोकांना वेळेवर शौचाला जाण्याची सवय नसते किंवा बराच काळ शौचाला रोखून धरणाऱ्यांना पुढे जाऊन हा त्रास होतो. या समस्येवर कोणते उपाय करता येतात ते जाणून घेऊयात. (Anti dandrafuff शाम्पूनेही केसातील कोंडा जाईना; अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरून पाहा) उपाय - जेवण व्यवस्थित चघळून खा. फायबरयुक्त आहार घ्या. एकदम जेवण्याऐवजी थोड्याथोड्या वेळाने जेवा. (प्रेग्नेन्सीतही मॉर्निंग होईल गूड; Morning Sickness असा करा दूर) हे पदार्थ आहारात असू द्या - हा त्रास होत असेल तर, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. नासपती, सफरचंद, मटार, ब्रोकोली, तांदूळ, डाळींचा समावेश करा. दही, सॅलड, आलं, अननस, पेरू हे पदार्थही खायला सुरूवात करा. केळं, आंबा, पालक, टोमॅटो, ड्रायफ्रुट आणि शतावरी सारख्या पदार्थांमध्ये असणारं पोटॅशियम या त्रासात फायदेशीर असतं. रात्रीचं जेवण वेळेवर करण्याची सवय लावा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन झोपा. (बहिणींनो भावासाठी निवडा राशीनुसार राखी; रक्षाबंधनच्या दिवसापासून होईल प्रगती) सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या. तरीही हा त्रास कमी होत नसेल तर, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. वेळीच पोटाच्या विकारांवर उपाय न केल्यास मोठ्या आजारांना तोंड द्यावं लागू शकतं. पोटाचे विकार वाढले तर, शस्त्रक्रिया कराव्या लागतात. ज्यामुळे खर्च आणि त्रास दोन्हीही वाढण्याची शक्यता असते. (टेन्शनमुळे दुखतंय डोकं? चंदनाचा लेप संपवेल वेदना; या पद्धतीने वापर करा) यासाठी आधीच काळजी घेणं गरजेचं आहे. पचनसंस्था सुधारण्यासाठी नियमित पोषक आहार घ्यावा,  मुबलक पाणी प्यावं आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करावेत. ज्यामुळे बिघडलेली पचनसंस्था पुन्हा पूर्ववत होऊ शकते. निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हा पोटाचे विकार दूर ठेवण्याचा सोपा मार्ग आहे.
  Published by:News18 Desk
  First published: