मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Anti dandrafuff shampoo वापरूनही केसातील कोंडा जाईना; एकदा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरून पाहा

Anti dandrafuff shampoo वापरूनही केसातील कोंडा जाईना; एकदा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरून पाहा

केसात कोंडा (Dandruff) झाला असेल तर, डोक्याला खूप खाज येते. बाहेर जाणंही कठीण होतं.

केसात कोंडा (Dandruff) झाला असेल तर, डोक्याला खूप खाज येते. बाहेर जाणंही कठीण होतं.

केसात कोंडा (Dandruff) झाला असेल तर, डोक्याला खूप खाज येते. बाहेर जाणंही कठीण होतं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : पावसाळा आणि थंडीमध्ये केसांची जास्त काळजी (Hair Care) घ्यावी लागते. पावसाळ्यामधल्या दमट वातावरणामुळे (Humid Climate) आजारपणाबरोबरच त्वचा आणि केसांच्या (Skin & Hair Problem) समस्याही वाढायला लागतात. या काळात वातावरणात ओलसरपणा असल्यामुळे केसांमध्ये कोंडाही (Dandruff) वाढायला लागतो. वातावरणातील ओलाव्यामुळे टाळूच्या (Scalp) काही भागात बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य इन्फेक्शनचा (Bacterial & Fungal Infections) धोका वाढतो. बऱ्याच लोकांना थंडीत आणि पावसाळ्यामध्ये केसात कोंडा होण्याचा त्रास होतो. केसात डॅन्ड्रफ झाला असेल तर, त्यासाठी बेकिंग सोडा आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगर (Baking soda & Apple Cider Vinegar) वापरता येऊ शकतो.

बेकिंग सोड्याचे फायदे

बेकिंग सोडा हा क्लिंजरप्रमाणे वापरता येतो. बेकिंग सोडा वापरल्यामुळे त्रास कमी होतो. बेकिंग सोड्याने केस धुतले तर कोंडा कमी होऊन केसांची वाढ होते.

(Private part मध्ये टाकले राजमा आणि...; लैंगिक सुखासाठी भलताच प्रयोग महागात)

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरदेखील केसांसाठी वापरता येतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. अ‍ॅपल सायडर  व्हिनेगरने केसांचा पीएच (PH) लेव्हल चांगला राहतो. याशिवाय आपले केस सिल्की आणि शायनी होतात. केस कोरडे शुष्क झाले असतील तर अ‍ॅपल सायडर  व्हिनेगर वापरावं.

(तिखटपणामुळे खाणं टाळू नका! झणझणीत मिरचीचेही आहेत आरोग्यासाठी फायदे)

कसा करावा वापर

केस शाम्पूने स्वच्छ धुवा. अ‍ॅपल साइडर व्हिनेगर पाण्यामध्ये मिसळा. हे पाणी आपल्या केसांच्या त्वचेला लावा. 10 ते 15 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ केस धुऊन टाका. यामुळे केसातील कोंड्याचा त्रास कमी होतो.

(त्वचेवर चट्टे उठून खाज येत असेल तर करा ही टेस्ट; दुर्लक्ष केल्याने अवघडतील सांधे)

ऑलिव्ह ऑइल आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

यासाठी 4 चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्यात 1 चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घाला आणि चांगलं मिसळा. हे मिश्रण टाळूवर लावा आणि 4  ते 5 मिनिटं मॉलिश करा. आता 1 तासानंतर केस धुवा.

First published:

Tags: Lifestyle, Skin care, Woman hair