गर्भवती महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. एस्ट्रोन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये वाढ झाल्याने खूप उलट्या होतात. बर्याच महिलांना सकाळी उलट्या होतात आणि घाबरल्यासारखं वाटतं. त्याला मॉर्निंग सिकनेस म्हणतात. शरीरात होत असलेल्या बदलांचा केवळ शारीरिक परिणाम होत नाही तर त्याचा मानसिक परिणामही होतो. यापैकी आणखी एक त्रास म्हणजे चक्कर येणं.