मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चेहऱ्यावर Ice Cube चा वापर करताना या चुका अजिबात करू नका, होतील उलट परिणाम

चेहऱ्यावर Ice Cube चा वापर करताना या चुका अजिबात करू नका, होतील उलट परिणाम

Ice Cube स्किनवर लावण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत होते आणि इन्स्टंट ग्लो येतो. परंतु बर्फाचा वापर योग्यरित्या होणंही तितकंच गरजेचं आहे. काही वेळा याचा फायदा न होता उलट परिणामही दिसू शकतात.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : अनेक महिला मेकअपच्या आधी आइस क्यूब अर्थात बर्फाचा (Ice Cube) वापर करतात, जेणेकरुन मेकअप केल्यानंतर लुक अधिक उठावदार होण्यास मदत होते. Ice Cube स्किनवर लावण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे ब्लड सर्कुलेशन (Blood Circulation) सुधारण्यास मदत होते आणि इन्स्टंट ग्लो येतो. त्वचेतून टॉक्सिन (Toxin) निघून त्वचा क्लियर होण्यास मदत होते.

चेहऱ्यावर पुरळ येणं आणि त्वचेच्या जळजळी सारख्या समस्येवरही बर्फ लावण्याने फायदा होतो. परंतु बर्फाचा वापर योग्यरित्या होणंही तितकंच गरजेचं आहे. काही वेळा याचा फायदा न होता उलट परिणामही दिसू शकतात.

हे 4 Beauty Secret लक्षात ठेवाच, घरगुती उपायांनी चाळीशीतही दिसाल चिरतरुण

थेट त्वचेवर बर्फ लावू नका -

बर्फ कधीही डायरेक्ट स्किनवर लावू नका. बर्फ लावताना तो आधी एखाद्या कपड्यात टाकून त्यानंतर कपड्यातूनच बर्फ चेहऱ्यावर लावा.

Skin Care Tips: वयाच्या तिशीनंतर चेहऱ्याला लावा हे खास घरगुती लोशन, त्वचा सतत दिसेल तरुण

चेहरा स्वच्छ करा -

Ice Cube कधीही स्वच्छ चेहऱ्यावरच लावावा. बर्फ लावताना चेहरा आधी स्वच्छ करा. चेहरा धुतल्याने त्वचेवरील ऑइल आणि घाण दूर होते आणि त्यानंतर स्किनवर बर्फ लावल्याने फायदा मिळतो.

या 5 चुकीच्या सवयी वय होण्यापूर्वीच हाडांना बनवतात कमकुवत; अशी घ्या काळजी

स्किन टाइप -

जर तुमची त्वचा सेंसेटिव असेल (Sensitive Skin) तर बर्फाचा थंडावा त्वचेला त्रासदायक ठरू शकतो. परंतु स्किन ड्राय (Dry Skin) असेल, तर बर्फ आठवड्यातून दोन वेळा लावू शकता. दररोज बर्फ लावल्याने त्वचेला जळजळही होऊ शकते. 15 मिनिटहून अधिक वेळ चेहऱ्याला बर्फाने मसाज करू नका.

First published:

Tags: Skin, Skin care