जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care Tips: वयाच्या तिशीनंतर चेहऱ्याला लावा हे खास घरगुती लोशन, त्वचा सतत दिसेल तरुण

Skin Care Tips: वयाच्या तिशीनंतर चेहऱ्याला लावा हे खास घरगुती लोशन, त्वचा सतत दिसेल तरुण

Skin Care Tips: वयाच्या तिशीनंतर चेहऱ्याला लावा हे खास घरगुती लोशन, त्वचा सतत दिसेल तरुण

Skin Care Tips in Marathi: वयाची तिशी उलटल्यानंतर त्वचेला विशेष काळजी घेतली जाण्याची गरज असते. हे लोशन त्वचेला खूप पोषण देईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी : वाढत्या वयाला काही थांबवलं जाऊ शकत नाही. मात्र वाढत्या वयाचा शरीरावर दिसणारा प्रभाव नक्कीच कमी केला जाऊ शकतो. त्यासाठीचा एक खास उपाय आज जाणून घ्या. या उपायातून तुमची त्वचा वयाच्या तीस (Skin Care After 30) वर्षांनंतरही अगदी विशीत असल्यासारखीच दिसेल. दीर्घकाळ त्वचेचा तजेला आणि तारुण्य टिकून राहिल. तुमच्या त्वचेला लावण्यासाठी एक खास घरगुती मिश्रण (Homemade Lotion) आम्ही सांगणार आहोत. हे रोज त्वचेवर लावाल तर याचे खास परिणाम लगेचच अनुभवायला मिळतील. या होममेड लोशनचे केवळ दोन थेम्ब हातावर घ्या. चेहरा आणि गळ्यावर याची मालिश करा. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्याही यातून गायब होतील. या अँटी एजिंग सीरमला (Anti Aging Serum) घरी कसं बनवता येईल ते जाणून घ्या. हेही वाचा तुम्ही सिंगल आहात? वाईट कशाला वाटून घेता, एकटं असण्याचे हे आहेत अनोखे फायदे हे सीरम बनवण्यासाठी एक गाजर, 1 बीट, 4 ते 5 भिजवलेले बदाम, थोडंसं गुलाबजल, 2 चमचे एलोवेरा जेल, 2 चमचे बदाम रोगन आणि व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल घेतली पाहिजे. हे सीरम बनवण्यासाठी तुम्ही आधी गाजर आणि बीट घ्या. चांगलं छिलून लहान-लहान तुकड्यात कापून घ्या. बदामाची साल काढा. आता हे सगळं गुलाबजलासह मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्या. हे मिक्श्चर एका कपड्यातून गाळून घ्या. एका छोट्या भांड्यात ठेवा. आता यात दोन चमचे एलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन इ ची एक कॅप्सूल फोडून त्यातलं तेल टाका. हे मिश्रण एका लहानशा बाटलीत भरून ठेवा. हेही वाचा Work From Home मध्ये वजन कमी करण्याची चांगली संधी; वाचा हे सोपे उपाय! रोज रात्री झोपण्याआधी (skin care at night) चेहऱ्याला चांगलं धुवून पुसून घ्या. साफ त्वचेवर याचे दोन थेंब टाकून चांगला मसाज करा. गेल्यावरही लावा. रात्रभर हे तसंच ठेवा. याचा त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसेल हे नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात